अलिबाग ध्वजवंदन

चक्क गुडघाभर पाण्यात उभे राहून ध्वजवंदन करण्याची वेळ

Alibaug Flag Hoisting: अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र गुडघाभर पाण्यात उभे राहून ध्वजवंदन करण्याची वेळ , विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा

चक्क गुडघाभर पाण्यात उभे राहून ध्वजवंदन करण्याची वेळ

Alibaug Flag Hoisting

अलिबाग (Alibaug Flag Hoisting) : देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र गुडघाभर पाण्यात उभे राहून ध्वजवंदन करण्याची वेळ आली. या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना पाण्यातच उभे राहावे लागले. तिरंग्याला सलाम करताना विद्यार्थ्यांच्या पायाखाली चिखल आणि पाणी असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. त्यामुळे या (Alibaug Flag Hoisting) शाळेतील पायाभूत सुविधांची अवस्था किती बिकट आहे, याची कल्पना येते. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या परिसरात पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यासाठी असलेली जागा अडवण्यात आल्याने ही समस्या निर्माण होत आहे.

परिणामी पावसाळ्यात पाणी शाळेच्या परिसरात साचते. गेल्या २५ वर्षांपासून ही समस्या कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की (Alibaug Flag Hoisting) विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून शाळेत ये-जा करावी लागते. मात्र, एवढ्या प्रदीर्घ काळापासून समस्या कायम असतानाही तिच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. सद्य परीस्थितीत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

संबंधित सामग्री

मोडकळीस आलेल्या खोलीत बनते मध्यान्ह भोजन

मोडकळीस आलेल्या खोलीत बनते मध्यान्ह भोजन

गडचिरोलीतील कोरेगाव जिल्हा परिषद शाळेची इमारत मोडकळीस आली असून, पडक्या खोलीत मध्यान्ह भोजन बनविले जात असल्याने पालकांमध्ये असंतोष आहे.

Sep 17, 2026
उदगीर तालुक्यातील ४८ जि.प. शाळांमधील १२६ वर्गखोल्या धोकादायक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

उदगीर तालुक्यातील ४८ जि.प. शाळांमधील १२६ वर्गखोल्या धोकादायक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, ही शिक्षण विभागाची प्राथमिक जबाबदारी असताना उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांबाबत चिंताजनक वास्तव समोर आले आहे.

Aug 28, 2026
'मंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?'

'मंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?'

CJP Abhijit Deepke: जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था पाहून संताप व्यक्त करत कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शासन- प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.

Aug 19, 2026
&quotमंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?&quot

अलिबागच्या शाळेत गुडघाभर पाण्यात ध्वजवंदन; धाकटे शहापूरमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अलिबागच्या शाळेत गुडघाभर पाण्यात ध्वजवंदन; धाकटे शहापूरमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र पाण्यात उभे राहून ध्वजवंदन करावे लागले.

Aug 16, 2026