Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

CJP अभिजीत दिपके

'मंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?'

CJP Abhijit Deepke: जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था पाहून संताप व्यक्त करत कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शासन- प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.


मंत्री-प्रशासनाची मुले बाकावर आमची मुले जमिनीवर का

CJP Abhijit Deepke |

अभिजीत दिपके यांचा गटविकास अधिकाऱ्याला 10 दिवसांचा अंतिम इशारा

हिंगोली (CJP Abhijit Deepke) : जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था पाहून संताप व्यक्त करत कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शासन- प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातील दुरावस्थेतील शाळांची पाहणी मोहीम त्यांनी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. 

सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके (CJP Abhijit Deepke) यांनी करताना शाळेची इमारत, बसण्याची व्यवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव पाहून दिपके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, "माझं शिक्षण झालंय, माझं लग्नही झालंय, माझी लेकरंही नाही आहेत. पण तरी मी येतोय. मग तुम्ही तुमच्या लेकरांसाठी का नाही येऊ शकत?"

शिक्षणातील दुजाभावावर बोट ठेवत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. "मंत्री यांची लेकरं, शिक्षण अधिकाऱ्यांची लेकरं, प्राचार्य यांची लेकरं खासगी शाळेत बाकावर बसतात. इथं शिकवायला येणाऱ्या शिक्षकांची मुलंही खासगी शाळेत बाकावर बसतात. मग जिल्हा परिषदेमधील शाळांमध्ये शिक्षण घेणारी आपली मुलं का जमिनीवर बसतात? आपल्या मुलांची लायकी कमी आहे का? नाही आहे ना कमी. मग त्यांनी का जमिनीवर बसावं? शाळा नीट झालीच पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.

ग्रामस्थांच्या उपस्थितीत अभिजीत दिपके (CJP Abhijit Deepke) यांनी प्रशासनाला 10 दिवसांचा अंतिम इशारा दिला. "जो कोणी गटविकास अधिकारी आहे त्यांना सांगा, दहा दिवसांच्या आत काम सुरू करा. दहा दिवसांच्या आत काम सुरू नाही झालं, तर गटविकास अधिकाऱ्याची नोकरी खाऊ आपण, शंभर टक्के," असे ते ठामपणे म्हणाले. त्यांच्या या भूमिकेला उपस्थित ग्रामस्थांनी मोठा पाठिंबा दिला.

कडोळीच्या शाळेची ही दुरावस्था केवळ एका गावापुरती मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यातील चित्र आहे, असे सांगत दिपके (CJP Abhijit Deepke) यांनी जिल्ह्यातील इतर शाळांची पाहणीही सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. शिक्षण हा मूलभूत हक्क आहे आणि त्यात कोणताही भेदभाव खपवून घेतला जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सध्या जिल्हा परिषद प्रशासन या अंतिम इशाऱ्यानंतर काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: