धुळे मध्ये गर्भधारणा लपवण्याचा प्रयत्न जीवघेणा ठरला; तरुणीचा दुर्दैवी अंत

जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे.

धुळे मध्ये गर्भधारणा लपवण्याचा प्रयत्न जीवघेणा ठरला; तरुणीचा दुर्दैवी अंत

Abortion Drug Misuse

धुळे (Abortion Drug Misuse) : जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने एका अविवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत तरुणी अवघी १८ वर्षांची होती आणि ती सुमारे सहा महिन्यांची गरोदर होती. औषधांचा अतिरेक झाल्यामुळे तिचा रक्तदाब अचानक घटला आणि तिला झटके येऊ लागले. तातडीने रुग्णालयात दाखल करूनही अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद मोहाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?
प्रकृती अचानक बिघडल्यामुळे संबंधित तरुणीला देवपूर येथील एका खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता ती सुमारे २४ आठवड्यांची (सहा महिने) गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. गर्भधारणा लपवण्यासाठी किंवा गर्भपात करण्याच्या उद्देशाने तिने काही औषधे घेतल्याची माहिती वैद्यकीय तपासणीतून समोर आली. ही बाब डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना सांगितली.

उपचारादरम्यान मृत्यू
गर्भपाताच्या गोळ्यांचे प्रमाण जास्त झाल्याने तिचा रक्तदाब वेगाने घसरला आणि तिला वारंवार झटके येऊ लागले. तिची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला तातडीने हिरे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात (ICU) तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.

मोहाडी पोलिसांत नोंद
घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी रुग्णालयात भेट देत पंचनामा केला. या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. एवढ्या प्रगत अवस्थेतील गर्भपातासाठी तिला औषधे कोणी उपलब्ध करून दिली, तसेच तिच्या गर्भातील बाळाचे पितृत्व कोणाचे होते, यासंदर्भात पोलिस सखोल चौकशी करत आहेत.

संबंधित सामग्री

खासगी रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करा

खासगी रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करा

गोरगरीब, वंचित तसेच सर्वसामान्य नागरिकांना उपचाराचा लाभ मिळावा, यासाठी शासनाकडून विविध आरोग्यविषयक योजना राबविण्यात येत आहेत.

Aug 28, 2026
अखिल भारतीय माळी महासंघाचा वर्धापन दिन, महिला आरोग्य शिबिर

अखिल भारतीय माळी महासंघाचा वर्धापन दिन, महिला आरोग्य शिबिर

All India Mali Federation: आखिल भारतीय माळी महासंघ, शाखा-टेकाडीचे आयोजन ‘वर्धापन दिवस’ व ‘महिला आरोग्य शिबिर’ व ‘सावित्रीच्या लेक्यांचे बैठक’ या उत्साहपूरण कार्यक्रमा

Jul 21, 2026
मध्यरात्री आमदार रामदास मसराम यांची कूरखेडा उपजिल्हा रुग्णालयावर अचानक धडक; स्वच्छतेवर संताप

मध्यरात्री आमदार रामदास मसराम यांची कूरखेडा उपजिल्हा रुग्णालयावर अचानक धडक; स्वच्छतेवर संताप

नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी मंगळवारी मध्यरात्री कूरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयावर अचानक भेट देत व्यवस्थेची पाहणी केली.

Apr 23, 2026