Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

विहिरीच्या कामावरून पिंपळखुटा शिवारात तलवार, रॉड व चाकूने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

विहिरीच्या कामाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका वृद्धासह त्यांच्या कुटुंबीयांवर लोखंडी रॉड, तलवार व चाकूने हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे.


विहिरीच्या कामावरून पिंपळखुटा शिवारात तलवार रॉड व चाकूने हल्ला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Well Construction Dispute |

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा; चार जण जखमी, उपचार सुरू

हिंगोली (Well Construction Dispute) : तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात विहिरीच्या कामाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका वृद्धासह त्यांच्या कुटुंबीयांवर लोखंडी रॉड, तलवार व चाकूने हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळखुटा शिवारातील गट क्रमांक ३७४ मधील शेतात विहिरीचे काम सुरू होते. ११ जून रोजी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास विहिरीचे काम लवकर करून दिले नाही, या कारणावरून काही मजुरांना मारहाण केली जात होती. त्यावेळी युसूफ भिका नंदावले यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी कासम भिका नंदावले यांनी हातातील लोखंडी रॉडने युसूफ नंदावले यांच्या डोळ्याजवळ मारहाण करून त्यांना जखमी केले. तसेच दगडानेही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर शकील कासम नंदावले यांनी तलवारीने युसूफ नंदावले यांच्या पत्नी मुन्नीबी नंदावले यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या जवळ विहिरीच्या कामगारांना देण्यासाठी आणलेले ३० हजार रुपये काढून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, रज्जाक कासम नंदावले यांनी हातातील लोखंडी टॅमीने युसूफ नंदावले यांचा मुलगा रफीक नंदावले यांच्या उजव्या हातावर वार करून जखमी केले. तर आसिफ कासम नंदावले यांनी फिरोज नंदावले यांच्या उजव्या हाताच्या बोटावर चाकूने वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेत जखमी झालेल्या सर्वांना तातडीने हिंगोली येथील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे डॉ. अखिल अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार केले.

या प्रकरणी १२ जून रोजी युसूफ भिका नंदावले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासम भिका नंदावले, शकील कासम नंदावले, रज्जाक कासम नंदावले आणि आसिफ कासम नंदावले (सर्व रा. गारमाळ) यांच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल धुळे करीत आहेत.

Related to this topic: