Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > क्राईम जगत

सर्वोच्च न्यायालय निर्णय

पिसाळलेल्या कुत्र्याकडून २५ जणांवर हल्ला; नागरिकांमध्ये प्रचंड घबराट!

Crushed Dog Attack: रिसोड शहरात मंगळवारी मोकाट कुत्र्याने जखमी करून २५ जणांवर हल्ला केला. लहान मुलांचाही समावेश असून काही गंभीर जखमी झाले.


पिसाळलेल्या कुत्र्याकडून २५ जणांवर हल्ला नागरिकांमध्ये प्रचंड घबराट 

Crushed Dog Attack |

 

सर्वोच्च न्यायालयाच्या 'त्या' निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी रिसोडमध्ये थरार

सतीश मांदळे
रिसोड (Crushed Dog Attack) :
रिसोड शहर व तालुक्यातील बिबखेडा येथे मोकाट कुत्र्याने मंगळवारी (दि. २० मे) अक्षरशः हैदोस घालत तब्बल २५ जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास बिबखेडा येथील मंगेश गजानन कुटे (वय ३५) यांच्या सहा वर्षीय मुलगी वीरा हिला कुत्र्याने चावा घेतला. मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या मंगेश कुटे यांच्यावरही कुत्र्याने हल्ला करून चेहरा, नाक व डोळ्याखाली गंभीर जखमा केल्या. त्यांना प्रथम रिसोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी वाशिम येथे हलविण्यात आले.

यानंतर सदर कुत्र्याने (Crushed Dog Attack) रिसोड शहरातील आसन गल्ली, चांदणी चौक, लोणी फाटा, रामनगर आदी भागांत नागरिकांवर हल्ले करत धुमाकूळ घातला. अनेकांच्या पायाला चावा घेतला गेला. काही नागरिक हे ग्रामीण भागातून कामानिमित्त शहरात आलेले होते. लोणी फाटा परिसरात आंबे विक्री करणाऱ्या एका महिलेलाही कुत्र्याने हल्ला करून जखमी केले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी संबंधित कुत्र्याला ठार मारल्याची माहिती समोर आली असून नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने त्याचा मृतदेह दफन केल्याचे सांगितले आहे.

रिसोड शहरात वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या (Crushed Dog Attack) समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून वाहनांसमोर धावणे, लहान मुलांवर झेप घेणे, पादचाऱ्यांवर हल्ले करणे या घटना सातत्याने घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. नगरपरिषदेकडे वारंवार मागणी करूनही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने १९ मे रोजी पिसाळलेल्या, अत्यंत आजारी किंवा मानवी जीवनासाठी धोकादायक भटक्या कुत्र्यांबाबत दयामरणाचा पर्याय वापरण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिल्याच्या पार्श्वभूमीवर रिसोडमधील ही घटना अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. नागरिकांच्या जीविताला धोका असल्यास प्रशासनाने कोणतीही तडजोड न करता कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

जखमींची नावे
या (Crushed Dog Attack) घटनेत जखमी झालेल्यांमध्ये मंगेश गजानन कुटे, वीरा मंगेश कुटे, आदेश ठाकरे, राहुल मधुकर जोशी, सुनीता अशोक बोराडे, प्रथमेश रवींद्र झडपे, विश्वनाथ ज्ञानबा बर्डे, मंगेश कुंडलिक काकडे, अब्दुल वहाब अब्दुल गणी, विजय जनार्दन जुमडे, भिकाजी बळीराम वाळके, शिवहरी निवृत्ती खडसे, लता शेषराव खरात, शुभम रामदास तिडके, राहुल किसन मानकर आणि ज्ञानेश्वरी खंडारे यांचा समावेश आहे

मोकाट कुत्र्यांच्या (Crushed Dog Attack) समस्येबाबत नागरिकांमध्ये असलेला संताप रास्त आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच आलेल्या निर्देशानुसार, मानवी जीवाला धोका ठरणाऱ्या आणि पिसाळलेल्या हिंस्र कुत्र्यांवर कारवाई करण्याबाबत आम्ही कायदेशीर पावले उचलत आहोत. येत्या दोन दिवसांत शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी,  विशेष मोहीम हाती घेतली जाईल. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि शहरात कुठेही असा आक्रमक कुत्रा आढळल्यास तात्काळ नगर परिषदेच्या आपत्कालीन विभागाशी संपर्क साधावा." सतीश शेवदा मुख्याधिकारी नगर परिषद रिसोड

Related to this topic: