Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > क्राईम जगत

जुगार अड्डा धाड

सत्रापुर लेबर कॅम्प येथील जुगार अडयावर पोलिसांची धाड

Gambling Den Raid: पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातील मोहिमे ला वेग देत सत्रापुर येथील लेबर कॅम्पवर धाड टाकुन जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले


सत्रापुर लेबर कॅम्प येथील जुगार अडयावर पोलिसांची धाड

Gambling Den Raid |

 

१० दुचाकींसह ४.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान (Gambling Den Raid) : पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातील मोहिमे ला वेग देत सत्रापुर येथील लेबर कॅम्पवर धाड टाकुन जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांच्या ताब्यातुन १० दुचाकी, चार मोबाईल फोन, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण ४ लाख २० हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
           
प्राप्त माहितीनुसार बुधवार (दि.२२) जुलै ला  कन्हान पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करित असताना मौजा सत्रापुर येथील लेबर कॅम्प मध्ये काही व्यक्ती ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावुन हार-जीतचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी धाड टाकली. या कारवाईत देवानंद शामराव कुरमनकर वय २७ वर्ष, रा. बोरडा, निरज राकेश तिवारी वय ३४ वर्ष, रा. पिपरी-कन्हान, मोहन महादेव शिवणकर वय २९ वर्ष, रा. पिपरी-कन्हान, कशीस कमल खडसे वय २३ वर्ष, रा. सत्रापुर, निहाल मोरेश्वर मेश्राम वय २४ वर्ष, रा. नया गोदाम कामठी आणि सारंग कार्तिक कुथे यांना जुगार खेळताना पकडण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून १० मोटारसायकली, चार मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकुण किंमत ४ लाख २० हजार ३८० रुपये इतकी आहे. (Gambling Den Raid) संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्श नात करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या नेतृत्वात पोउपनि मरकट, पोहवा नरेश बाटबरई, पोना अनिल यादव, पोशि आकाश सिरसाट, नवीन पाटील, जीवन विघे आणि राहुल जाधव यांनी यशस्विरित्या कारवाई पार पाडली.

Related to this topic: