Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > क्राईम जगत

लग्नपत्रिका सायबर गुन्हा

परभणीत लग्नपत्रिकेच्या नावाखाली एपीके फाईल; मोबाईल हॅक करून सायबर गुन्हेगारांचा नवा डाव!

Wedding Invitation Cyber Crime: आता लग्नपत्रिकेच्या नावाखाली एपीके फाईल पाठवून मोबाईल हॅक करण्याचा नवा प्रकार समोर आला असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.


परभणीत लग्नपत्रिकेच्या नावाखाली एपीके फाईल मोबाईल हॅक करून सायबर गुन्हेगारांचा नवा डाव

Wedding Invitation Cyber Crime |

 

पाथरीतील नागरिकाचा अनुभव; संशयास्पद फाईल डाउनलोड न करण्याचे पोलिसांचे आवाहन

गजानन घुंबरे
पाथरी (Wedding Invitation Cyber Crime) :
सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून नवनवीन शक्कल लढवली जात आहे. पूर्वी बँकेची ई केवायसी, सरकारी योजना किंवा बक्षीस मिळाल्याचा बहाणा करून एपीके (APK) फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडले जात होते. मात्र आता लग्नपत्रिकेच्या नावाखाली एपीके फाईल पाठवून मोबाईल हॅक करण्याचा नवा प्रकार समोर आला असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

पाथरी शहरातील शिक्षक राम घटे यांना नुकताच याचा कटू अनुभव आला. त्यांच्या मोबाईलवर आलेली एक एपीके फाईल त्यांनी चुकून डाउनलोड केली. त्यानंतर त्यांचा मोबाईल हॅक झाला. काही वेळातच त्यांच्या व्हॉट्सअॅपवरील संपर्कातील अनेकांना त्यांच्या क्रमांकावरूनच (Wedding Invitation Cyber Crime) 'लग्नाचे आमंत्रण' असा इंग्रजीतून भाषेतून संदेश आणि त्यासोबत एपीके फाईल पाठविण्यात आली.

संदेशामध्ये  समारंभाच्या संपूर्ण तपशिलासाठी जोडलेले आमंत्रण डाउनलोड करा, असे नमूद असल्याने अनेकांनी ती (Wedding Invitation Cyber Crime) लग्नपत्रिका समजून फाईल डाउनलोड केली. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागल्याची माहिती राम घटे यांनी दिली. साधारण दोन ते तीन दिवसांनी त्यांचा मोबाईल पूर्ववत सुरू झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरील स्टेटस आणि इतर माध्यमांतून आपला मोबाईल हॅक झाल्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या मोबाईलवरून कोणाला फसवे संदेश गेले असतील तर दिलगिरीही व्यक्त केली.

यापूर्वीही अशा प्रकारच्या संशयास्पद लिंक किंवा एपीके फाईल डाउनलोड केल्यानंतर अनेकांच्या बँक खात्यातील रक्कम लंपास झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये,  एपीके (APK )अशी फाईल डाउनलोड करू नये, तसेच अशा फाईल्स पुढे इतरांना पाठवू नयेत. सध्या सोशल मीडियावर 'लग्नाचे आमंत्रण ' या नावाने संदेश पाठवून नागरिकांना फसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा संदेशांना बळी न पडता तात्काळ दुर्लक्ष करावे. संबंधित व्यक्तीला थेट फोन करून खात्री करून घ्यावी आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास सायबर हेल्पलाईन १९३० किंवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी असे आवाहन पाथरी पोलीस ठाण्याचे पोनि. लक्ष्मण केंद्रे यांनी केले आहे.

Related to this topic: