Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > क्राईम जगत

पारडा खून प्रकरण

पारडा येथील दांम्पत्याच्या खून प्रकरणात आरोपींना पोलीस कोठडी

Parda Murder Case: पारडा तालुक्यातील बळीराम व कलावतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आरोपींना अटक केली गेली. गुन्ह्यावरून पोलिसांनी काही मुख्य आरोपींना अटक करण्याचा निर्णय


पारडा येथील दांम्पत्याच्या खून प्रकरणात आरोपींना पोलीस कोठडी

Parda Murder Case |

हिंगोली (Parda Murder Case) : तालुक्यातील पारडा येथील बळीराम देवबा वाघमारे व कलावती देवबा वाघमारे या  वयोवृध्द दांम्पत्याच्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिन आरोपींना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पारडा शिवारात १८ जून रोजी बळीराम देवबा वाघमारे व कलावती बळीराम वाघमारे या दांम्पत्याचे मृतदेह आढळून आले होते. यामध्ये बासंबा पोलीसात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. हे दुहेरी खून प्रकरण करणीच्या संशयावरून झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यात पोलीसांनी पारडा येथील अक्षय घनश्याम वाघमारे, राजु गौतम वाघमारे तर इसापुर रमना येथील चालक राहु सम्राट खंदारे या तिघांना अटक करण्यात आली होती.

यामधील मुख्य आरोपी राजु वाघमारे याची प्रकृती वारंवार बिघडत होती. (Parda Murder Case) मयत बळीराम व कलावती वाघमारे हे करणी करत असल्याच्या संशयावरून तिघांनी हत्या केल्याची कबुली दिली. त्यांना ४ जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता ६ जुलैपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे यांनी दिली.

Related to this topic: