Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > क्राईम जगत

परभणी अपघात प्रकरण

परभणीत अपघात प्रकरणी कारचालकास २ वर्ष सक्तमजूरी

Parbhani accident case: परभणीत झालेल्या अपघातात कारचालक सुनिल सोनवणे यास जिल्हा व सत्र न्यायालयाने २ वर्ष सक्तमजूरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.


परभणीत अपघात प्रकरणी कारचालकास २ वर्ष सक्तमजूरी

Parbhani accident case |

पाथरी शहरातील अपघात प्रकरण; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

परभणी (Parbhani accident case) : भरधाव वेगात व निष्काळजीपणे कार चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने कारचालकास २ वर्ष मजूरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथरी शहरातील रतन रोहिदास कड हे २६ एप्रिल २०१८ रोजी पाथरी तहसील कार्यालया समोर भाचा समर्थ व शिल्पा यांच्यासोबत उभे होते. यावेळी मानवतहून येणार्‍या भरधाव कारने त्यांना धडक दिली. या (Parbhani accident case) धडकेत भाचा समर्थ याचा जागीच मृत्यू झाला होता. तर भाची शिल्पा हीच्या डोक्यास व कमरेला मार लागला होता. या प्रकरणी कारचालका विरुध्द गुन्हा द ाखल करण्यात आला होता.  तपासिक अधिकारी सपोनि. किशोन बोधगिरे यांनी तपास करुन दोषारोप पत्र पाथरी प्रथमवर्ग दंडाधिकारी यांच्या कक्षात सादर केले होते. १८ मे २०२२ रोजी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी आरोपी कारचालक सुनिल लिंबाजी सोनवणे यास निर्दोष मुक्त केले.

मात्र रतन कड यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपिल केले. सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आले असता २७ एप्रिल २०२६ रोजी निकाल देताना न्या. एन.आर. नाईकवाडे यांनी कारचालक सुनिल सोनवणे यास दोषी ठरवले. २ वर्ष सक्तमजूरी आणि ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच शासनातर्पेâ फिर्यादी रतन कड यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. 

सदर प्रकरणात मुख्य सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. आनंद गिराम, अ‍ॅड. भारत चिलवंत यांनी सरकार पक्षातर्पेâ बाजू मांडली. तर पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधिक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोउपनि. सुरेश चव्हाण, दिलीप रेंगे, मपोह वंदना आदोडे, पोह सचिन धबडगे यांनी काम पाहिले.

Related to this topic: