Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > क्राईम जगत

परभणी इसम खून

परभणीतील पूर्णा शहरात भरदिवसा एकाचा खून

Parbhani Isam Murder: पूर्णा शहरात एका व्यक्तीला सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर चाकूने दोन अज्ञात हल्लेखोरांनी खून केला. खून झालेल्या व्यक्तीने देवराव बेंजाजी साखरे


परभणीतील पूर्णा शहरात भरदिवसा एकाचा खून 

Parbhani Isam Murder |

 

मॉर्निंग वॉकला गेलेल्या इसमावर धारधार चाकूने वार दोन अज्ञात हल्लेखोर फरार...!

परभणी (Parbhani Isam Murder ) : पूर्णा तालुक्यात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एकावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी भररस्त्यात चाकूने सपासप वार करून निर्घृण खून केला. ही घटना शहरातील  गुड मॉर्निंग रोडवरील हिरो शोरूम ते राजमुद्रा चौक दरम्यान शुक्रवार  २२ मे रोजी सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास घडली. घटने नंतर दोन हल्लेखोर पसार झाले.या बाबत अधिक माहिती अशी की, देवराव बेंजाजी साखरे (वय ५०, रा. धनगर गल्ली, पूर्णा असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

देवराव सावरे हे नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गाठून कोणतीही संधी न देता सिनेस्टाईल पद्धतीने गळ्यावर व पोटावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या (Parbhani Isam Murder) हल्ल्यात साखरे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनेनंतर हल्लेखोर क्षणार्धात घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने पूर्णा पोलिसांना कळविले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पवार, फौजदार प्रकाश इंगोले, पोलिस कर्मचारी श्रीश टाकस व बालाजी शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.

गंभीर जखमी अवस्थेतील देवराव साखरे (Parbhani Isam Murder) यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पूर्णा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान,  देवराव साखरे हे खाजगी सावकारी करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आर्थिक व्यवहार, सावकारीतील वाद किंवा जुने वैमनस्य या अनुषंगाने पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. पूर्णा पोलिस ठाण्यात नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्यासमोर शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.  

दिवसाढवळ्या घडलेल्या या खूनप्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही चर्चा सुरू झाली आहे.