Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > क्राईम जगत

परभणी जुगार छापा

परभणीत तिर्रट जुगार्‍यांवर छापा; ३ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त

Parbhani gambling raid: परभणीतील बाभळगाव शिवारामध्ये जुगारीचे खेळवण्याच्या ठिकाणावर पोलिसांनी छापा टाकला. यातील ३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल, दुचाकी आणि जुगाराचे पुरावे जप्त


परभणीत तिर्रट जुगार्‍यांवर छापा ३ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त

Parbhani gambling raid |

 

स्थानिक गुन्हे शाखा पथकाची बाभळगाव शिवारात कारवाई

परभणी (Parbhani gambling raid) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार १६ जून रोजी पहाटेच्या सुमारास उमरी रोडवर बाभळगाव शिवारामध्ये तिर्रट जुगार्‍यांवर छापा टाकला. या कारवाईत रोख रक्कम, दुचाकी, जुगाराचे साहित्य मिळून ३ लाख ८५ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी दैठणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्थागुशाचे पोनि. गजेंद्र सरोदे, पोउपनि. चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार रविकुमार जाधव, धोत्रे, आगाशे यांचे पथक कोम्बींग ऑपरेशन दरम्यान दैठणा पोलीस ठाणे हद्दित गस्त घालत होते. या पथकाला बाभळगाव शिवारात काही इसम मोबाईल लाईटच्या उजेडात तिर्रट जुगार खेळत बसले असल्याची माहिती मिळाली. यावरुन पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. रोख रक्कम, दुचाकी आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. सदर प्रकरणी अफसर खान पठाण, अशोक पारधे, सय्यद करीम, अमृत दळवे, पंथ यांच्यावर दैठणा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.