Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > क्राईम जगत

गॅस सिलेंडर चोरी

परभणीत गॅस सिलेंडर टाक्या चोरणारी टोळी गजाआड

Gas cylinder theft: परभणी जिल्ह्यातील खवणे पिंपरीत इंडियन गॅस एजन्सीच्या गॅस सिलेंडरांचा १४ टाक्यांचा चोर याचिकेत आला. आरोपी राजेश पवार यांनी घरून चोरी केली


परभणीत गॅस सिलेंडर टाक्या चोरणारी टोळी गजाआड

Gas cylinder theft |

 

पाथरी पोलीसात गुन्हा दाखल; गॅस सिलेंडरच्या १४ टाक्या, पिकअप  जप्त

परभणी (Gas cylinder theft) : सेलू तालूक्यातील खवणे पिंपरी येथील इंडियन गॅस एजन्सीचे गोडावून तोडून गॅस सिलेंडरच्या टाक्यांची चोरी झाल्याची घटना २६ मार्च रोजी घडली होती. या प्रकरणी पाथरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची उकल शुक्रवार १० जुलै रोजी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन पाथरी यांच्याकडून चालू करण्यात आली. व एका आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपी राजेश पवार, गणेश काळे रा. इंदिरानगर पाथरी, व गौतम भगवान आदमाने रा. सारोळा ता.पाथरी या तीघांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरून आरोपी राजेश पवार याच्या घरून चोरी केलेल्या गॅस सिलेंडरच्या १४ टाक्या तसेच गुन्ह्यात वापरलेली एका कंपनीचे पिकअप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील मुख्य आरोपी राजेश पवार यांच्याकडे पाथरी येथे गॅस एजन्सी असून त्याने यापूर्वी घनसावंगी पोलीस स्टेशन हद्दीतून कुंभारी पिंपळगाव येथून देखील गॅस सिलेंडरच्या जवळपास ६० टाक्या चोरी केले असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.       सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशावरुन अप्पर पोलीस अधीक्षक  तानाजी चिखले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अशोक जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी नरके, पोलीस उपनिरीक्षक गणेश सवंडकर, पोलीस अंमलदार, विलास सातपुते, रंगनाथ दुधाटे, विष्णू चव्हाण, मधुकर ढवळे, हनुमान ढगे, उत्तम हनवते, घुगे, बालाजी रेड्डी, गणेश कोटकर यांच्या पथकाने केली.

फरार आरोपीला घेतले ताब्यात
परभणी :
कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेला आरोपी शंकर बाबुराव काळे हा परभणी येथे घरी आल्याचे समजल्यावर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. पाठलाग करत आरोपीला पकडण्यात आले. ही कारवाई स्थागुशाचे पोलीस अंमलदार सुर्यकांत फड,  निलेश परसोडे, चाटे, कवढाळे, दुधाटे, पौळ, सावंत, डुब्बे, भदर्गे, वाघ, कांगने यांच्या पथकाने केली.