Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > क्राईम जगत

परभणी लुटमार प्रकरण

परभणीत चाकूचा धाक दाखवून लूट करणाऱ्या दोघांना अटक; सोयाबीन, दुचाकी व चाकू जप्त

Parbhani robbery case: जिंतूर तालुक्यात चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व सोयाबीनची लूट करणाऱ्या दोन आरोपींना जिंतूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेले ९० किलो सोयाबीन, एक चाकू


परभणीत चाकूचा धाक दाखवून लूट करणाऱ्या दोघांना अटक सोयाबीन दुचाकी व चाकू जप्त

Parbhani robbery case |

परभणी (Parbhani robbery case) :  जिंतूर तालुक्यात चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व सोयाबीनची लूट करणाऱ्या दोन आरोपींना जिंतूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेले ९० किलो सोयाबीन, एक चाकू आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच जबरी चोरीच्या दुसऱ्या एका प्रकरणातही पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून २ लाख १८ हजार ५०० रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगंदबा वेसरहाडस (ता. जिंतूर) येथील विलास बाबुराव सावंत यांनी जिंतूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. २० जुलै रोजी सायंकाळी जगंदबा वेअरहाऊस परिसरात सुनील उत्तमराव राठोड व कृष्णा कुंडलिक राठोड (दोघे रा. रायखेडा, ता. जिंतूर) यांनी संगनमत करून फिर्यादीस चाकूचा धाक दाखविला. "तुझ्याकडे किती पैसे आहेत?" अशी विचारणा करत आरोपींनी त्यांच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच ९० किलो सोयाबीनही चोरी करून नेल्याची तक्रार करण्यात आली होती.

या (Parbhani robbery case) प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१३/२०२६ दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. चौकशीदरम्यान आरोपी कृष्णा कुंडलिक राठोड याच्याकडून सुमारे ८ हजार रुपये किमतीचे ९० किलो सोयाबीन, एक चाकू आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली.

जबरी चोरीप्रकरणी एकास अटक
दरम्यान, कानड (ता. जिंतूर) येथील शालन संजय हुलगुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रू रामकिसन चव्हाण याच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीच्या पतीस धमकावून ३ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन हिसकावून नेल्याचा आरोप आरोपीवर आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सावकर विभाग, परभणी यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी चंद्रू चव्हाण याला हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथून ताब्यात घेतले. अटकेवेळी त्याच्याकडून २ लाख १८ हजार ५०० रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्याला २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल विपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नामदेव रेड्डी, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती लोकडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर चव्हाण, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गुगाणे व पोलिस कॉन्स्टेबल सचिन जाधव यांनी केली.