Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > क्राईम जगत

परभणी जबरी चोरी

परभणीत जबरी चोरीचा बनाव अवघ्या काही तासात उघड

Parbhani Force Robbery: मानवत रोड ते पेडगाव दरम्यान घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेची स्थानिक गुन्हे शाखेने उकल केली आहे. सदर घटना बनाव असल्याचे अवघ्या काही तासात उघडकीस आणण्यात पोलिसांना यश


परभणीत जबरी चोरीचा बनाव अवघ्या काही तासात उघड

Parbhani Force Robbery |

 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आरोपीजवळून रोख साडे तीन लाख जप्त...?

परभणी (Parbhani Force Robbery) : मानवत रोड ते पेडगाव दरम्यान घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेची स्थानिक गुन्हे शाखेने उकल केली आहे. सदर घटना बनाव असल्याचे अवघ्या काही तासात उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. स्थागुशाने एका आरोपीला अटक केली आहे. तसेच साडे तीन लाख रुपये रोख आणि मोबाईल मिळून ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

परभणी ग्रामीण पोलिसात प्रथमेश शहाणे याने माहिती दिली होती. तो दहिवाल ज्वेलर्स परतुर येथे कामगार असून दुकान मालकाने त्याच्याकडे सात लाख रुपये रोख रक्कम दिली होती. ही रक्कम घेऊन दुचाकीने परतुर सेलू मार्गे परभणीला येत असताना मानवत रोड ते पेडगाव दरम्यान लघुशंकेसाठी थांबला. यावेळी चार अज्ञात इसमांना चाकुचा धाक दाखवून त्याच्याजवळील रक्कम बळजबरीने लुटली. (Parbhani Force Robbery) घटनेचे गांभिर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या. पोनि. गजेंद्र सरोदे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून तपास सुरू केला. या तपासात माहिती देणार्‍यानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने जबरी चोरीचा बनाव रचल्याचे समोर आले.

तपासा दरम्यान तीन आरोपी निष्पन्न झाले. पोलिसांनी इमरान शेख याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून रोख साडे तीन लाख रुपये आणि एक मोबाईल मिळून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही (Parbhani Force Robbery) कारवाई पोनि. गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात पोउपनि. चंदनसिंह परिहार, गणेश सवंडकर, पोलीस अंमलदार विलास सातपुते, केशव लटपटे, रणजीत आगळे, सुर्यकांत फड, रंगनाथ दुधाटे, महेश कौठाळे, राहुल परसोडे, सचिन भदर्गे, शरद सावंत, दिलीप निलपत्रेवार, माणिक वाघ, विष्णू चव्हाण, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, हनुमान ढगे, निलेश परसोडे, उत्तम होते, शारेक मोहम्मद, सुर्यकांत सातपुते यांच्या पथकाने केली.