Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

परभणी कोम्बींग ऑपरेशन

परभणीत कोम्बींग ऑपरेशन; फरार आरोपी ताब्यात...!

Parbhani Combing Operation: दैठणा व सेलू पोलिस ठाण्यातील गुन्ह्यापासून चोर, घरफोड्या आरोपींना पकडण्यात आले. कोम्बिंग ऑपरेशनच्या काळात ताब्यात घेण्यात येत असतानाच फरार आरोपींना पोलिसांनी हजर


परभणीत कोम्बींग ऑपरेशन फरार आरोपी ताब्यात

Parbhani Combing Operation |

 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दैठणा,सेलू पोलीस ठाण्यातील गुन्हे

परभणी (Parbhani Combing Operation) : घरफोडी, चोरी सारख्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. दैठणा, सेलू पोलीस ठाणे हद्दित दाखल गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात आले आहे. कोम्बींग ऑपरेशन दरम्यान स्थागुशाच्या पथकाने सदर कारवाई केली.

दैठणा पोलीस ठाणे हद्दित दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात तेजसिंग सुरजसिंग भोंड हा आरोपी फरार होता. त्याचा शोध घेत ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी दैठणा पोलिसात हजर करण्यात आले आहे. तर सेलू पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी कन्हैय्यासिंग धारासिंग दुधाणी याला परभणीतील साखला प्लॉट येथून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थागुशाचे पोनि. गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अशोक जायभाय, पोउपनि. मधुकर चट्टे, सपोउपनि. सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, पोलीस अंमलदार नेताजी गिते, तुपसुंदर, बुधवंत, हनवते, केशव लटपटे, विलास सातपुते, रवि जाधव, सुर्यकांत फड, सिध्देश्वर चाटे, विष्णू चव्हाण, नामदेव डुबे, मधुकर ढवळे, राम पौळ यांच्या पथकाने केली.

Related to this topic: