Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > क्राईम जगत

परभणी कार अपघात

परभणीत भरधाव कारची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

Parbhani car accident: पालम येथील भरधाव वेगातील टाटा सफारी कार चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले.


परभणीत भरधाव कारची दुचाकीला धडक एकाचा मृत्यू 

Parbhani car accident |

 

केरवाडी बस स्थानका जवळील घटना अपघातात दोघे जखमी

परभणी (Parbhani car accident) : पालम येथील भरधाव वेगातील टाटा सफारी कार चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले. ही घटना पालम -गंगाखेड रोडवरील केरवाडी बस स्थानक परिसरात घडली. सदर प्रकरणी वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  लक्ष्मण गंगाधरराव जाधव यांच्या फिर्यादीवरुन मोसीन अब्दुल कादर यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सदर वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील एमएच २६ बी.सी.७७२७ या क्रमांकाची (Parbhani car accident) गाडी भरधाव वेगात निष्काळजीपने चालवून दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक दिली. या अपघातात नामदेव खंडुजी जाधव वय ४५ वर्ष रा.केरवाडी यांच्या मृत्यू झाला. तर हरिओम रंगनाथ भुसनर, हनुमंत लक्ष्मण खरात हे दोगे गंभीर जखमी झाले आहेत. प्रकरणाचा तपास पोउपनि प्रकाश लोखंडे करत आहेत.

Related to this topic: