Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

अल्पवयीन मुलीचा गैरवर्तन

परभणीत अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन;आरोपीची आत्महत्या

Minor Girl Misconduct: ६२ वर्षीय इसमानने अल्पवयीन मुलासोबत गैरवर्तन कडकले असल्याची रिपोर्ट पोलिसांना देण्यात आली. त्या शेतात आत्महत्या करून मृत्यू पावला.


परभणीत अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तनआरोपीची आत्महत्या

Minor Girl Misconduct |

 

वाणी पिंपळगाव येथील घटना; गुन्हा नोंद झाल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

परभणी (Minor Girl Misconduct) :  पालम तालुक्यातील अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याने गुन्हा दाखल झाल्याचे माहित होताच आरोपीने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवार १८ जून रोजी पालम तालुक्यातील वाणी पिंपळगाव शेत शिवारात उघडकीस आली. 

सदर घटनेबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वाणी पिंपळगाव येथील एका साडे आठ वर्षीय मुलीसोबत ६२ वर्षीय इसमाने गैरवर्तन केल्याची तक्रार पिडितेच्या आईने पालम पोलीस ठाण्यात दिली. यावरुन पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा नोंद झाल्याचे समजताच या प्रकरणी आरोपी ६२ वर्षीय इसमाने वाणी पिंपळगाव शिवारात शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

समाजात बदनामी होईल, या भितीतून आरोपीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Minor Girl Misconduct) आत्महत्येमागचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल. या प्रकरणी पालम पोलिसात नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.