Parbhani Illegal Weapons: परभणीत रात्रीत शनिवार रात्री पोलिसाने तीन आरोपांना ताब्यात घेतले. त्यांने बाळगलेले अवैध पिस्तौली, दुचाकी आणि मोबाइल जप्त केले. या मुद्देमालाचा किमती एक लाख रुपये
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईl कोतवाली पोलीसात गुन्हा, आरोपी ताब्यात
परभणी (Parbhani Illegal Weapons) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार १८ जुलै रोजी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणार्या तिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी नेताजी बळीराम गीत्ते यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात शेख साजीद शेख जाफर , शेख रिझवान शेख मुजीब आणि शेख इरशाद शेख याकुब उर्फ बाबा सर्व रा. अजीजिया नगर, परभणी यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्रुात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजीजिया नगर परिसरात गुप्त माहिती मिळाली असता स्थागुशाच्या पथकाने छापा टकला आसता काही संशयीत व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून एक लोखंडी गावठी पिस्तूल, पासिंग क्रमांक नसलेली एक दुचाकी आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हाधिकार्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
सदरील कारवाई (Parbhani Illegal Weapons) पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पोलीस उपनिरीक्षक सावंडकर, पोशि फड,पोशि महेश पांगरकर, पोलीस कर्मचारी नेताजी गीत्ते, पोशि पुरी व पोशि निलेश परसोडे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.
लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
स्थानीक गुन्हे शाखेने कारवाईदरम्यान आरोपींकडून ३० हजार रुपये किमंतीचा एक गावठी कट्टा, ६० हजार किंमतीची एक दुचाकी आणि १० हजार किंमतीचा एक मोबाईल असा एकूण १ लाखांचा मुद्देमाल जप्त करत करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील तीन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .