Breaking News
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
  • रांजणगाव गणपतीजवळ मिक्सर रोडखाली उतरला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
  • धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा
  • फिसाळलेल्या कुत्र्याने एका सहा वर्षांच्या मुलासह आठ जणांचा चावा घेतल्याची घटना रायगडच्या कर्जतमधून समोर आली आहे
  • सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
  • पंढरपूरमध्ये चालत्या एसटी बसची डिझेल टाकी तुटली; एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  • बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान
  • पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक;पुण्यातील कोंढवा भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
  • धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी,अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराचा उडाला फज्जा

होम > क्राईम जगत

नांदेड एसटी बस चोरी

​धक्कादायक! चक्क नांदेड एसटी आगारातून बस चोरण्याचा प्रयत्न

Nanded ST Bus Theft: नांदेडमध्ये २३ मे रोजी पहाटे एसटी बस चोरलेला प्रयत्न केला गेला. सुरक्षा यंत्रणा रामभरोसे असल्याने संशयित आरोपी पकडला गेला.


​धक्कादायक चक्क नांदेड एसटी आगारातून बस चोरण्याचा प्रयत्न

Nanded ST Bus Theft |

 

सुरक्षा यंत्रणा रामभरोसे?

​नांदेड (Nanded ST Bus Theft) : शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड आगारात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे. २३ मे रोजी पहाटेच्या सुमारास चक्क आगारातूनच एसटी बस चोरून पळवून नेण्याचा प्रयत्न एका अज्ञात इसमाने केला. मात्र, वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे हा मोठा अनर्थ टळला असून संशयित आरोपीला रंगेहात पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे एसटी महामंडळ आणि प्रवासी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना २३ मे च्या पहाटे घडली. विष्णू गणपत निल्लावार नावाचा एक संशयित इसम खाकी कपडे परिधान करून पहाटे ४ वाजेपासूनच नांदेड आगार परिसरात संशयास्पदरीत्या रेंगाळत होता. खाकी कपड्यांमुळे तो महामंडळाचाच कर्मचारी असावा, असा गैरसमज निर्माण झाला असावा. पहाटे अंदाजे ५:३० वाजताच्या सुमारास या इसमाने आगारात उभी असलेली नांदेड आगाराची बस क्रमांक एमएच १४ एमएच १३८० ही बस चालू करून (Nanded ST Bus Theft) बस आगाराच्या मुख्य गेटमधून बाहेर काढून पळवून नेण्याच्या प्रयत्नात होता.

​​बस चोरून (Nanded ST Bus Theft) नेत असताना, आरोपीचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही बस आगारात उभ्या असलेल्या 'शिवाई' या ई-बसला जाऊन घासली. बसचा आवाज आणि झालेला अपघात पाहून तिथे कर्तव्यावर असलेले वाहन परीक्षक एस. डी. लाईचेट्टीवर यांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखत बस चालवणाऱ्या संशयित विष्णू निल्लावार याला जागीच पकडले आणि गाडीतून खाली उतरवले.

​​वाहन परीक्षक एस.डी.लाईचेट्टीवर यांनी तात्काळ या घटनेची माहिती नांदेड आगारातील वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना दिली. त्यानंतर वजिराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना पाचारण करण्यात आले. सुरक्षा रक्षकांनी संशयित आरोपीला पोलिसांच्या हवाली केले असून, वजिराबाद पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आणि पुढील कायदेशीर कारवाईचे काम सुरू आहे.

​"संशयित इसमाने पहाटेच्या सुमारास बस चालू करून ती बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, (Nanded ST Bus Theft) वाहन परीक्षकांनी त्याला रंगेहात पकडून सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करत आहेत."
-डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय नियंत्रक, नांदेड.

अनेक गंभीर प्रश्न उपस्थित

- ​या घटनेमुळे नांदेड आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत.
- पहाटेच्या वेळी आगारात कोणताही अनोळखी इसम खाकी कपडे घालून फिरत असताना सुरक्षा रक्षकांचे याकडे लक्ष का गेले नाही? ​
- एसटी बसच्या चाब्या इतक्या सहज कोणाच्याही हाती कशा लागतात?
- जर वाहन परीक्षकांनी वेळीच रोखले नसते, तर बस रस्त्यावर येऊन मोठा अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
- ​या गंभीर प्रकारानंतर आता तरी एसटी प्रशासन आगारातील सुरक्षा व्यवस्था कडक करणार का? असा प्रश्न नांदेडमधील नागरिक आणि प्रवासी विचारत आहेत.