Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

परभणी जुगार अड्डा छापा

परभणीत शिर्शी बु. शिवारात तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा...!

Parbhani Gambling Raid: परभणीतील शिर्शी बु. शिवारात गुन्हे शाखेच्या पथकाने तीररट जुगार खेळणाऱ्या पाच आरोप्यांना छापा घेतला. त्यांच्या कडून ५ लाख ५ हजारे १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त


परभणीत शिर्शी बु शिवारात तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा

Parbhani Gambling Raid |

 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त...!

परभणी (Parbhani Gambling Raid) : येथुन जवळच असलेल्या  शिर्शी बु. शिवारात तीर्रट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून तब्बल ५ लाख ५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, अन्य तीन फरार आरोपींविरुद्धही ताडकळस पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार १२ जून रोजी सायंकाळी शिर्शी बु. शिवारातील रतन गंगाधर ढगे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली काहीजण पैशावर तीर्रट जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता आरोपी अनिल कोंडीराम जोगदंड आकाश वाघोळे, सरजेराव रायमाले, दत्ता रायमाले , अंकुश पुरी   यांच्यासह अन्य तीन अज्ञात आरोपी जुगार खेळताना आढळून आले. (Parbhani Gambling Raid) कारवाईदरम्यान आरोपींकडून रोख रक्कम, सहा मोबाईल, चार मोटार सायकली, ५२ पत्त्यांचा कॅट तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ५ लाख ५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

याप्रकरणी परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोशि हनुमान ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. (Parbhani Gambling Raid) प्रकरणाचा पुढील तपास पोह.पोते हे करत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पानि गजेंद्र  सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि परीहार, पोहेकॉ दुधाटे, वड, रामकिशन काळे, बुकरे, राठोड, क्षीरसागर, चौरे व इतर पथकाने संयुक्तरीत्या केली.

फरार आरोपींचा शोध सुरू

शिर्शी बु. शिवारातील तिर्रट जुगार अड्ड्यावर कारवाई (Parbhani Gambling Raid) केल्यानंतर फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके कार्यरत केली आहेत. (Parbhani Gambling Raid) जुगार, अवैध धंदे व कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणार्‍या कृत्यांविरोधात जिल्हाभरात अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

Related to this topic: