Breaking News
  • "जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही!" – तुपकरांचा सरकारला इशारा
  • अल निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाई होण्याची शक्यता
  • बारामती शहरात आता एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार
  • नाशिकमध्ये वाद मिटवण्याच्या बहाण्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
  • नाशिक-मुंबई महामार्गावरील आर.सी. पाटील पुलावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील मागे बसलेल्या महिलेचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.
  • परभणीत दाखल होताचा खासदार संजय जाधव यांना मिळणार Y+ सुरक्षा
  • बीडमध्ये FDA ची मोठी कारवाई; 6.68 लाखांचा मुद्देमाल जप्त
  • पुणे- ग्रामीण जबरी चोरी, चेन स्नॅचिंग व घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
  • छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत ५२.२८ टक्के मतदान

होम > क्राईम जगत

परभणी खंडोबा कॉर्नर खून प्रकरण

परभणीत पत्नीने कट रचून केला पतीचा खून; पत्नीसह साथीदारांवर गुन्हा...!

Parbhani Khandoba Corner Murder: परभणीत रविवारी मध्यरात्री, एका ३० वर्षीय पतीचा (फेरोज खान) पत्नी जिनत खानने धारदार शस्त्राने वार करून खून केला. चारित्र्याच्या संशयावरून सुरू असलेल्या वादातून हा खून


परभणीत पत्नीने कट रचून केला पतीचा खून पत्नीसह साथीदारांवर गुन्हा

Parbhani Khandoba Corner Murder Case |

 

परभणीतील खंडोबा कॉर्नर खून प्रकरण...!

परभणी (Parbhani Khandoba Corner Murder Case) : शहरातील खंडोबा बाजार परिसरात रविवारी मध्यरात्री एका ३० वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेत पती-पत्नीमधील नेहमी चारित्र्याच्या संशयावरून सुरू असलेल्या वादातून घडली, असे तपासात समोर आले. पोलिसांनी मृताच्या पत्नीसह तिच्या साथीदारांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील खंडोबा बाजार (Parbhani Khandoba Corner Murder Case) भागातील मराठवाडा शाळेजवळील एका घरात रविवार ३० मे च्या मध्यरात्री १.३० वाजता घडलेल्या हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फेरोज खान अब्दुला खान (वय ३०) याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी त्याची पत्नी जिनत फेरोज खान (वय २८) व तिच्या साथीदारांविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेरोज खान आणि त्याची पत्नी जिनत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चारित्र्याच्या संशयावरून सातत्याने वाद होत होते. शनिवारी रात्री ते रविवारी पहाटे १.२० ते १.४० वाजण्याच्या दरम्यान घरातच फेरोज खानवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. त्याच्या गळ्यावर, पोटावर आणि हातावर वार करण्यात आले होते. गंभीर जखमी झालेल्या फेरोजचा अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाला.  

हा खून पत्नी व त्याच्या एका साथीदारने मिळून केल्याचे समोर आले.  घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील, नानलपेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फिंगरप्रिंट व श्वानपथकाच्या मदतीने पुरावे संकलित करण्यात आले. मयताचा भाऊ सरफराज खान अब्दुल्ला खान (रा. उस्मानिया कॉलनी, परभणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) व ३(५) अन्वये पत्नी जिनत खान आणि तिच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम
या (Parbhani Khandoba Corner Murder Case) प्रकरणातील इतर संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, विशेष पथक आणि नानलपेठ पोलिसांची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, मृताची पत्नी जिनत खान हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे.

Related to this topic: