Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

बस-दुचाकी अपघात

जवळाबाजार येथे बस-दुचाकीच्या धडकेत तरुण ठार, चालक फरार

Bus-Bike Accident: औंधा-नागनाथमार्गावर जवळाबाजारचे शेतकरी गजानन कदम, बस-दुचाकीच्या धडक्यात ठार. अपघातात बस चालक फरार


जवळाबाजार येथे बस-दुचाकीच्या धडकेत तरुण ठार चालक फरार

Bus-Bike Accident |

जवळाबाजार (Bus-Bike Accident) : औंढा नागनाथ-परभणी मार्गावर जवळाबाजार शिवारात रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भरधाव एसटी बस व दुचाकीच्या समोरासमोर धडकेत 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गजानन दत्तराव कदम (रा. वगरवाडी, ता. औंढा नागनाथ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

गजानन कदम शेती करीत होता. आज जवळाबाजार येथे आठवडी बाजार असल्याने तो सकाळी दुचाकीने बाजारासाठी आला होता. काम आटोपून वगरवाडीकडे परतत असताना जवळाबाजारपासून काही अंतरावर हिंगोलीहून परभणीकडे जाणाऱ्या एसटी बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात गजानन रस्त्यावर कोसळला आणि डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर (Bus-Bike Accident) बस चालकाने बस जागेवरच सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वगरवाडी येथील ग्रामस्थ व औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत, जमादार दिलीप नाईक, जमादार राजू ठाकूर, रवीकांत हरकाळ,महामार्ग पोलीस चे खयामुद्दीन खतीब व राजाराम कदम हेही उपस्थित होते .खाजगी रुग्णवाहिकेचा चालक सुनील वाघमारे यांनी मृतदेहाचे मेंदूचे अवयव गोळा करण्यास मदत केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जवळाबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. 

पोलिसांनी बस जप्त केली असून फरार बस चालकाला ताब्यात घेतले जाणार असल्याचे सांगितले. गजाननच्या अकाली निधनाने वगरवाडी गावावर शोककळा पसरली आहे.