Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

मानोरा पोलिस कारवाई

मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात मानोरा पोलिसांना यश!

Manora Police Action : मानोरा पोलिसांनाच्या मार्गदर्शनाखालील तपासणीतील कौशल्याने मोटार सायकल चोरीचा गुन्हा केवळ ४८ तासांच्या आत उघडकीस आणला आहे.


मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात मानोरा पोलिसांना यश   

Manora Police Action |

 

48 तासांत चोरीची हिरो पॅशन प्रो जप्त; 33 वर्षीय आरोपी गजाआड!

मानोरा (Manora Police Action) : मानोरा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या मोटार सायकल चोरीचा गुन्हा मानोरा पोलिसांनी केवळ ४८ तासांच्या आत उघडकीस आणला आहे. चोरी गेलेली हिरो कंपनीची पॅशन प्रो मॉडेल काळ्या रंगाची मोटार सायकल मुद्देमालासह जप्त करण्यात आली आहे.  

पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार पो. स्टे. मानोरा येथे अप. क्र. 338/2026 कलम 303(2) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी  उपविभागीय पोलीस अधिकारी  विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नैना पोहेकर यांच्या आदेशाने गुन्हेप्रतिबंधक व शोध पथक तयार करण्यात आले होते.  पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना आरोपी नितीन डिंगार टवकर, वय 33 वर्षे, रा. भुलाई ता. दारव्हा जि. यवतमाळ याने सदर मोटारसायकल चोरी केल्याबत गोपनीय माहिती मिळाली.

सदर माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने आरोपीस चौकशीकामी ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन कौशल्याने विचारपूस केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी गेलेली हिरो कंपनीची पॅशन प्रो मॉडेल काळ्या रंगाची मोटार सायकल क्र. एम.एच.37 एम. 3873, किमत अंदाजे 54,000/- रु. जप्त करण्यात आली आहे.   सदर कामगिरी वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी  विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात पार पडली.  
प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती नैना पोहेकर व त्यांच्या पथकातील पोउपनि सागर भारसकर, पोहवा राधेश्याम महल्ले, गणेश राठोड, पोकॉ पंकज खाडे, रोहन तायडे, चेतन भोयर यांनी ही कारवाई केली आहे.

Related to this topic: