Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > क्राईम जगत

मानवत ड्रग्स साठा जप्त

परभणीतील मानवतमध्ये साडे चौदा लाखाचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त

Manwat MD Drug seized: परभणीत रत्नापूर शिवारात १४ लाख ६४ हजार रुपयांचा एमडी ड्रग्सचा साठा सोमवारी रात्री जप्त झाला. पोलिसांनी दोन संशयित अटक करण्यात आली


परभणीतील मानवतमध्ये साडे चौदा लाखाचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त

Manwat MD Drug seized |

 

रत्नापूर शिवारात स्थागुशा, मानवत पोलिसांची कारवाई 
पोलीस अधिक्षक पंकज कुमावत तळ ठोकून

परभणी (Manwat MD Drug seized) : मानवत येथे पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई करत रत्नापूर शिवारातून १४ लाख ६४ हजार ४०० रुपये किंमतीचा प्रतिबंधीत अंमली साठा सोमवार २७ जुलै मध्यरात्री १:४० वाजता जप्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार २७ जुलै रोजी पहाटे १.४० वाजण्याच्या सुमारास मानवत–पाथरी राष्ट्रीय महामार्गा वरील रत्नापूर शिवारातील मारोती मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत अलीम शेख खाजा रा. नायरा पेट्रोल पंपजवळ, पाथरी आणि शाहरुख फिरोजखान पठाण रा. रविवार पेठ, अंबाजोगाई यांना ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान आरोपी अलीम शेख याच्याकडून ५२ ग्रॅम ३८ मिलीग्रॅम एमडी अंमली पदार्थ, ज्याची किंमत १० लाख ४७ हजार ६०० रुपये, तर शाहरुख पठाण याच्याकडून २० ग्रॅम ८४ मिलीग्रॅम एमडी, ज्याची किंमत ४ लाख १६ हजार ८०० रुपये असल्याचे आढळून आले. तसेच एमएच-१२-एमई-९३७० क्रमांकाची स्कूटी जप्त करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस हवालदार सय्यद उमर सय्यद अमीन यांच्या फिर्यादीवरून मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनी श्ािंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खिल्लारे, करीत आहेत. कारवाईनंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सरोदे तसेच सहायक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज कुमावत रात्रभर पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते.

Related to this topic: