Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

Lohagad Murder Case

लोहगड हत्या प्रकरणात नवा खुलासा; सिया गोयल-चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच केल्याचा गुप्त विवाहाचा पोलिसांचा दावा

लोहगड हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा धागा लागल्याचा दावा करण्यात आला आहे.


लोहगड हत्या प्रकरणात नवा खुलासा सिया गोयल-चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच केल्याचा गुप्त विवाहाचा पोलिसांचा दावा

व्हॉट्सअॅप चॅट, कॉल रेकॉर्ड आणि डिजिटल पुराव्यांच्या तपासातून महत्त्वाची माहिती; वेब सिरीज, पॉडकास्ट आणि जुन्या गुन्ह्यांचा अभ्यास केल्याचाही दावा

पुणे : लोहगड हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा धागा लागल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी सुमारे चार महिन्यांपूर्वीच गुप्तपणे विवाह केला होता, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून समोर आली आहे. आरोपींच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅटसह इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी करताना ही बाब उघड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मोबाईलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीची सखोल छाननी सुरू केली आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांतील डिजिटल माहितीची पडताळणी करण्यात येत असून, त्यातून अनेक महत्त्वाचे तपशील समोर येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

तपासात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी आपल्या कुटुंबीयांपासून ही बाब लपवून चार महिन्यांपूर्वी विवाह केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. हा विवाह केतन अग्रवाल आणि सिया यांच्या १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या साखरपुड्याच्या आसपास झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, हा विवाह साखरपुड्यापूर्वी झाला की नंतर, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

दरम्यान, तपासात आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचण्यापूर्वी आरोपींनी विविध वेब सिरीज, पॉडकास्ट आणि देशातील वेगवेगळ्या राज्यांतील खुनांच्या घटनांचा अभ्यास केल्याचा पोलिसांचा दावा आहे. गुन्हा कसा करावा आणि संशय कमी कसा येईल, यासंदर्भातील माहिती त्यांनी इंटरनेटवरून गोळा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चाकू किंवा इतर शस्त्रांचा वापर केल्यास पुरावे मागे राहण्याची आणि आरोपी पकडले जाण्याची शक्यता वाढते, असा निष्कर्ष आरोपींनी काढला होता. तसेच अशा शस्त्रांची खरेदी, वापर आणि नंतर त्यांची विल्हेवाट लावणे हेही जोखमीचे ठरू शकते, असा विचार त्यांनी केला होता. त्यामुळे कोणतेही शस्त्र न वापरता उंच कड्यावरून ढकलून देऊन हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे सियाने चौकशीत सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणात मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांची तपास यंत्रणेकडून अद्याप सखोल पडताळणी सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकलून व्यावसायिक केतन अग्रवाल यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या दोन्ही आरोपी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असून, याच कालावधीत सुरू असलेल्या तपासातून त्यांच्या कथित गुप्त विवाहासह इतर महत्त्वाच्या बाबी समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Related to this topic: