Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > क्राईम जगत

लातूर शेतकरी गुन्हा दाखल

बैलजोडी खरेदी करून गावी चालत जात असलेल्या शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल!

Latur Farmer Crime: लातूर जिल्ह्यातील अरजखेडा येथील शेतकऱ्यांनी बैलजोडी खरेदी केली आणि गावाकडे पाठीमागे जाताना त्यांना पोलिसांनी रोखले. पोलिसांनी बैलांचे गोरक्षण


बैलजोडी खरेदी करून गावी चालत जात असलेल्या शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल 

Latur Farmer Crime |

 

लातूरात चोर सोडून सन्यास्याला फाशी चा प्रत्यय?

लातूर (Latur Farmer Crime) : अरजखेडा येथील शेतकरी भीमराव सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी हे दोघे पाटोदा येथील बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी करून आपल्या अरजखेडा गावाकडे पायी निघाले होते. त्यांच्या हातात ग्रामपंचायतीचे अधिकृत जनावर खरेदी-विक्री दाखले होते… तरीही वाटेत त्यांना अडवण्यात आले. खोपेगाव परिसरात काही बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरू केली. “बैल कुठे नेताय?” “कशासाठी नेताय?” असे सवाल करत त्यांना बराच वेळ रोखून ठेवले.

धक्कादायक म्हणजे… शेतकऱ्यांनी (Latur Farmer Crime) सर्व कागदपत्रे दाखवूनही त्यांना सोडण्यात आलं नाही. यानंतर राजीव गांधी चौकात पुन्हा त्यांना अडवण्यात आलं. वाढता तणाव पाहून महेश सूर्यवंशी यांनी थेट पोलिस हेल्पलाईनला फोन केला. विवेकानंद पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले… मात्र कारवाई अडवणाऱ्यांवर नव्हे, तर बैलजोडी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल करून जनावरे गोरक्षणात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे "चोर सोडून सन्यास्याला फाशी" अशी हकिकत शेतकऱ्यांच्या नशीब आली आहे. 

“शेतीसाठी बैल खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच गुन्हेगार (Latur Farmer Crime) ठरवलं जात असेल, तर सामान्य शेतकऱ्यांनी जगायचं कसं?” असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. सध्या खरीप हंगामासाठी बैलजोडी खरेदी करणे, खत बि बियाणे याची तजवीज शेतकरी करत आहेत. त्यातच आरजखेडा येथील शेतकरी भिमराव सुर्यवंशी पिता, पुत्र यांनी पाटोदा येथील बाजारातून बैलजोडी खरेदी करून पायी गावाकडे जाताना त्यांच्यावर हा प्रसंग ओढावला आहे. जर शेतकऱ्यांवर नाहक गोरक्षाकातर्फे  होणारा त्रास सहन केला जाणार नाही.यावर आवाज उठवला जाईल असे शिवसेनेचे कुलदीप सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.