Parbhani Clerk Bribe: दोन लाचखोर लिपिकांनी दुचाकीच्या नावावर करण्यासाठी लाच मागितली. परभणी लाच लढाऊ पंचतंत्राने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात काजल व मोबाईल जपत केले.
परभणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; दुचाकीस्वाराला मागितली लाच
परभणी (Parbhani Clerk Bribe) : दुचाकी नावावर करण्यासाठी तसेच दुचाकीचा नंबर संगणकावर पडताळून दंड प्रलंबीत नसल्याची खात्री शिक्का मारण्यासाठी लाच मागणार्या दोन लिपिकांवर कारवाई करण्यात आली आहे. परभणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवार ३ जुलै रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय असोला येथे कारवाई केली. संबंधितांवर ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिरा नारायणराव लोकरे कनिष्ठ लिपिक, सय्यद जफर सय्यद अकबर लिपिक असे ताब्यात घेण्यात आलेल्या लाचखोर कर्मचार्यांची नावे आहेत. बुधवार १ जुलै रोजी २८ वर्षीय तरुणाने तक्रार दिली होती. दुचाकी स्वत:च्या नावावर करण्यासाठी आवश्यक ते शुल्क भरल्यानंतर मिरा लोकरे यांनी १ हजाराची लाच मागितली. तडजोडी अंती ८०० रुपये ठरले. तसेच लिपिक सय्यद जफर याने संबंधित तक्रारदाराने खरेदी केलेल्या मोटारसायकलचा नंबर संगणकावर पडताळून आरटीओ कार्यालय मार्फत दंड प्रलंबीत नसल्याची खात्री करुन कागदपत्रावर नो वॉन्टेड शिक्का मारुन दुचाकीचा नंबर लिहिण्याच्या कामासाठी ५०० रुपये मागितले.
यानंतर शुक्रवार३ जुलै रोजी (Parbhani Clerk Bribe) परभणी लाचलूचपत विभागाच्या पथकाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय असोला येथे सापळा लावला. लिपिक मिरा लोकरे, सय्यद जफर यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून रक्कम स्विकारली. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक महेश पाटणकर, पोलीस निरीक्षक अलताफ मुलाणी आणि कर्मचार्यांच्या पथकाने केली. लाचखोरां जवळून मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.