Breaking News
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात
  • रायगडच्या महाडमध्ये जोरदार पाऊस; सकाळपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणानंतर महाडमध्ये जोरदार पाऊस
  • RSSचे लोक माझ्यावर हल्ला करतील: अभिजीत दीपके

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरी वाळू माफिया

कळमनुरी पोलिसांची वाळूमाफियांवर सलग दुसर्‍या दिवशीही कारवाई; वाळूमाफ्यांचे धाबे दणाणले

Kalamnuri sand mafia: कळमनुरी पोलिसने अवैध वाळू वाहतुकीवर दुसरा दिवसात मोठी कारवाई केली. पोलिसांनी एका ट्रॅक्टरमधून ५.२६ लाख रुपयांचे माल जप्त केले.


कळमनुरी पोलिसांची वाळूमाफियांवर सलग दुसर्‍या दिवशीही कारवाई वाळूमाफ्यांचे धाबे दणाणले

Kalamnuri sand mafia |

कळमनुरी (Kalamnuri sand mafia) : कळमनुरी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात सुरू केलेली मोहीम दुसर्‍या दिवशीही कायम ठेवत मोठी कारवाई केली आहे. या सलग कारवाईमुळे तालुक्यातील वाळूमाफ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीसांना सांडस शिवारात अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरद्वारे एक ब्रास वाळूची वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रॅक्टरसह वाळू असा एकूण ५ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यापूर्वी २१ जून रोजीही पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. सलग दुसर्‍या दिवशी झालेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा व वाहतूक करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. २२ जून रोजी झालेल्या कारवाईप्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर शिरसागर यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुदाम गाडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या (Kalamnuri sand mafia) प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शेळके करीत आहेत. पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा दिल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

Related to this topic: