Girls Atrocities Case: १४ वर्षाचे मुलीचे नेटीकरण आणि अत्याचार, पोलिसाने १८ जुलै रोजी आरोपी मारुत सोहम ऐंगडेवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली. घटना बरबडी येथे झाली.
पूर्णा तालुक्यातील बरबडी येथील घटना पिडितेच्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल...!
परभणी (Girls Atrocities Case) : पूर्णा तालुक्यात शिकवणीला गेलेल्या १४ वर्ष १० महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीवर शेतात नेत अत्याचार करण्यात आला. ही घटना १४ जुलै रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील बरबडी येथे घडली. पिडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीवर १८ जुलै रोजी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडित मुलीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, १४ जुलै रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास बरबडी येथे शिकवणीला गेल्यावर आरोपीने त्या ठिकाणी जाऊन मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणत तिला गाठले. त्यानंतर शिकवणी जवळ कॅनॉल रोड लगत असलेल्या एका ऊसाच्या शेतात पिडितेला ओढत नेले. या ठिकाणी बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. घडला प्रकार कोणाला सांगितल्यास तुला, तुझ्या भावाला आणि वडिलांना मारुन टाकीण, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर धक्क्यात गेलेल्या मुलीने अखेर घडला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर १८ जुलै रोजी पूर्णा पोलिसात मारोती सोहम ऐंगडे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सपोनि. पाटील करत आहेत. (ता.प्र.)