Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > क्राईम जगत

पाथरी अवैध गुटखा जप्त

परभणीतील पाथरीत ८ लाखांचा ७४ हजारांचा अवैध गुटखा जप्त; दोन आरोपी फरार!

Illegal Gutkha Seized: पाथरी तालुक्यातील आष्टी महामार्गावरील वडी पाटीजवळ शनिवारी केलेल्या कारवाईत ८ लाख ७४  रुपयांचा अवैध गुटखा व चारचाकी वाहन जप्त केले.


परभणीतील पाथरीत ८ लाखांचा ७४ हजारांचा अवैध गुटखा जप्त दोन आरोपी फरार

Illegal Gutkha Seized |

 

स्थानिक गुन्हे शाखेची वडी पाटीजवळ कारवाई; वाहन सोडून आरोपींनी पळ काढला

परभणी (Illegal Gutkha Seized) : येथील स्थानिक गुन्हे शाखेने परभणीतील पाथरी तालुक्यातील आष्टी महामार्गावरील वडी पाटीजवळ शनिवारी केलेल्या कारवाईत ८ लाख ७४  रुपयांचा अवैध गुटखा व चारचाकी वाहन जप्त केले. या प्रकरणातील दोन्ही आरोपी वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शनिवार २५ जुलै रोजी रात्री १ च्या सुमारास पाथरी तालुक्यात पेट्रोलिंग करत असताना आष्टीकडून पाथरीकडे स्विफ्ट डिझायर कारमधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला  मिळाली होती. त्यानुसार पथकाने पाथरी आष्टी रोडवरील वडी पाटी येथे सापळा रचला. यावेळी पोलिसांचे वाहन पाहताच संशयिताने कारसह पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता रामपुरी ढालेगाव मार्गावर रामपुरी गावाजवळ आरोपीने कार सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.

त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये राज निवास सुगंधित पान मसाला नावाचा अवैध गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला. पोलिसांनी २ लाख ७४ हजार ३५० रुपयांचा गुटखा आणि  ६ लाख किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ८ लाख ७४ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त केला. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात   भारतीय न्याय संहितेच्या विविध कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदरील कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जायभाय, पीएसआय सवंडकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार विलास सातपुते, सचिन भदर्गे, सूर्यकांत फड, महेश पांगरकर, माणिक वाघ, विष्णू चव्हाण, मधुकर ढवळे, पुरी,  हनवते व सय्यद यांनी संयुक्तपणे केली. फरार आरोपींचा शोध घेऊन पुढील तपास पाथरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

Related to this topic: