Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > क्राईम जगत

लाचखोर सहाय्यक कृषि अधिकारी

लाचखोर सहाय्यक कृषि अधिकारी निलंबित

Corrupt Asst Agriculture Officer: जलालपूर येथील सहाय्यक कृषि अधिकारी मोहन भगवानराव माने यांनी पाच हजाराची लाच स्विकारली होती. यामध्ये औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल


लाचखोर सहाय्यक कृषि अधिकारी निलंबित

Corrupt Asst Agriculture Officer |

हिंगोली (Corrupt Asst Agriculture Officer) : औंढा नागनाथ तालुक्यातील दौडगाव शिवारामधील केळी पिकाचे अनुदान मिळण्यासाठी सहा मस्टरवर स्वाक्षरी करून ते तालुका कृषि अधिकार्‍याकडे पाठविण्याकरीता जलालपूर येथील सहाय्यक कृषि अधिकारी मोहन भगवानराव माने यांनी पाच हजाराची लाच स्विकारली होती. यामध्ये औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्यात विभागीय कृषि सहसंचालक महेशकुमार तिर्थकर यांनी मोहन माने यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

औैंढा नागनाथ तालुक्यातील दौडगाव येथील एका व्यक्तीच्या वडीलोपार्जीत शेत जमिन गट क्र.२११ मध्ये केळीची लागवड करण्यात आली होती. केळी पिकाचे अनुदान मिळविण्यासाठी सहा मस्टरवर स्वाक्षरी करून ते तालुका कृषि अधिकार्‍यांकडे पाठविण्यासाठी प्रत्येकी मस्टरचे १ हजार रुपये प्रमाणे अशा ६ मस्टरच्या कामासाठी  ६ हजार रुपयाची मागणी केल्यानंतर तडजोडीत पाच हजाराची रक्कम स्विकारतांना १८ जुन रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील जलालपूर येथील (Corrupt Asst Agriculture Officer) सहाय्यक कृषि अधिकारी मोहन भगवानराव माने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, भगवान मंडलिक, गजानन पवार, शिवाजी वाघ, विनोद पुंडगे यांच्या पथकाने हिंगोली परभणी जाणार्‍या रस्त्यावर औढा नागनाथ येथील ग्रॅज्युएट गुळाच्या चहा टपरी समोर  रंगेहात पकडले होते.

या (Corrupt Asst Agriculture Officer) प्रकरणात औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ज्यामध्ये सहाय्यक कृषि अधिकारी मोहन माने यांना १९ जूनला अटक करून न्यायालयात हजर केले असता २२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या बाबतचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विभागीय कृषि सहसंचालक लातूर यांच्याकडे पाठविला होता. त्यावरून लातूर विभागाचे विभागीय सहसंचालक महेशकुमार तिर्थकर यांनी मोहन भगवानराव माने यांच्या निलंबनाचे आदेश काढले. १९ जून पासुन त्यांना निलंबित करण्यात आले असुन या कालावधीत त्यांचे मुख्यालय उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड येथे देण्यात आले. या दरम्यान पुर्व परवानगी शिवाय त्यांना निलंबन कालावधीमध्ये नेमुण देण्यात आलेले मुख्यालय सोडता येणार नाही असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Related to this topic: