Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

गोरेगाव जुगार छापा

गोरेगावातील झन्ना मन्ना जुगारावर छापा; सहा जणांवर गुन्हा दाखल

Goregaon gambling raid: गोरेगाव पोलिसांनी २१५० रुपये जप्त करून सहा जुगार्‍यांवर गुन्हा दाखल केला. यातच फक्त २१५० रुपये जप्त झाले, तर अन्य धरतीच्या काळज्यावर अवैध धंदे करणाऱ्या लोकांचा संशोधन करत आहे.


गोरेगावातील झन्ना मन्ना जुगारावर छापा सहा जणांवर गुन्हा दाखल

Goregaon gambling raid |

 

छाप्यात फक्त २१५० रुपये जप्त; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

हिंगोली (Goregaon gambling raid) : जिल्ह्याची राजधानी म्हणुन ओळखल्या जाणार्‍या गोरेगावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झन्ना मन्ना जुगारावर छापा मारला. परंतु या छाप्यात केवळ २१५० रुपये जप्त करून सहा जुगार्‍यांवर गुन्हा दाखल केला. 

जिल्ह्यात अवैध धंदे चालता कामा नये, असे धोरण तत्कालिन पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी राबविले होते. त्यांच्या बदलीनंतर आता हळूहळू अवैध धंद्यावाल्यांनी तोंड वर काढले आहे. २८ जूनला गोरेगाव येथे मधुकर कावरखे यांच्या घरा समोर झन्ना मन्ना जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच त्यांनी दुपारी २.२० वाजता छापा मारला. या छाप्यात फक्त २१५० रुपये पोलिसांच्या हाती लागले.

या (Goregaon gambling raid) प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे नितीन गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तराव काशिराम सोळंके, मधुकर आनंदा कावरखे, प्रकाश सुर्यकांत कावरखे, दत्ता किसन बक्काल, नामदेव किसनराव कावरखे, पवन राजाराम मोरे सर्व रा. गोरेगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या जुगार्‍यांना ताब्यात घेऊन नोटीसवर सोडले. या प्रकरणाचा पुढील तपास राहूल मैदकर हे करीत आहेत.  अवैध धंद्यावाल्यांनी तोंड वर काढल्याने नूतन पोलिस अधिक्षक या अवैध धंद्याचा बिमोड करणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.