Sword Attack Death: गोगलगाव, मानवत तालुक्यातील तलवार हल्ल्यात गंभीर जखमी विष्णू पाथरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्ला जुन्या भांडणावर आधारित होता. पोलिसाने गुन्हेगारांचे नाव नोंदले आहे.
जुन्या वादातून झाला होता हल्ला; पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
परभणी (Sword Attack Death) : मानवत तालुक्यातील गोगलगाव येथे जुन्या वादातून तलवार, लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यातील एका गंभीर जखमीवर परभणीत उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान सोमवार ८ जून रोजी जखमीचा मृत्यू झाला. विष्णू पाथरकर, असे मयताचे नाव आहे. मंगळवार ९ जून रोजी पोलीस बंदोबस्तात मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मानवत तालुक्यातील गोगलगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवत ४ जून रोजी तलवार, लोखंडी रॉडने तिघांवर हल्ला करण्यात आला. सदर प्रकरणात मानवत पोलिसात गुन्हा दाखल झाला. या (Sword Attack Death) हल्ल्यामध्ये विष्णू पाथरकर हे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारा दरम्यान सोमवार ८ जून रोजी विष्णू पाथरकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युची माहिती गोगलगाव येथे पोहोचताच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मंगळवार ९ जून रोजी पोलीस बंदोबस्तात मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या (Sword Attack Death) प्रकरणात गोपाल मगर, अजय उर्फ अदिनाथ मगर, कृष्णा मगर, नवनाथ मगर, आबासाहेब मगर, मनकर्णा मगर व सिमा यांच्यावर गुन्हा नोंद आहे. प्रकरणाचा तपास सपोनि. दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.