Parbhani Woman Rape: गंगाखेड तालुक्यात विट भट्टीवर काम करणाऱ्या एका पंचवीस वर्षीय महीलेवर बलात्कार करुन जाळून तिची हत्या केल्याप्रकरणी गंगाखेड
गंगाखेड अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांचा निकाल
परभणी (Parbhani Woman Rape) : गंगाखेड तालुक्यात विट भट्टीवर काम करणाऱ्या एका पंचवीस वर्षीय महीलेवर बलात्कार करुन जाळून तिची हत्या केल्याप्रकरणी गंगाखेड येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश - २ व्ही.एम. सुंदाळे यांनी तीन आरोपीनां जन्मठेपेच्या शिक्षेसह एकास पस्तीस हजार रुपये व दोघांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड ठोठावला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या एका विट भट्टीवर काम करणाऱ्या २५ वर्षीय महीलेवर लैंगीक अत्याचार केल्यानंतर जाळुन तिचा खून केल्याप्रकरणी दि.५ एप्रिल २०१३ रोजी पिडीत महिलेने तत्कालीन कार्यकारी तथा नायब तहसीलदार व वैद्यकीय अधिकाऱ्यांसमक्ष दिलेल्या मृत्युपुर्व जबाबावरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शंकर सिटीकर यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर सत्र खटला क्रं. २३/२०१४ शासन वि. बाबासाहेब सोडगीर या खटल्यात सरकार पक्षाने एकुण दहा साक्षीदार तपासले त्यात पिडीत महिलेचा मृत्युपुर्व जबाब व तो जबाब नोंदविणारे कार्यकारी दंडाधिकारी तथा नायब तहसिलदार यांचा तसेच वैद्यकीय अधिकारी व घटनास्थळ पंच यांची साक्ष महत्वाची ठरली.
या (Parbhani Woman Rape) गुन्ह्याचा तपास करणारे तपासीक अंमलदार पोलीस निरीक्षक शंकर सिटीकर हे मयत झाल्यामुळे त्यांना तपासण्यात आले नव्हते. साक्षी पुराव्यातून न्यायालयासमोर आलेल्या सर्व बाबी मान्य करुन गंगाखेड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश-२ व्ही.एम. सुंदाळे यांनी उपरोक्त प्रकरणात दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकुण आरोपी क्रमांक १ बाबासाहेब राणबा सोडगीर रा. खळी ता. गंगाखेड यास कलम ३७६ (१) खाली १० वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड व कलम ३०२, ३४ खाली जन्मठेप व पंचवीस हजार रुपये दंड, आरोपी क्र. २ रंजना लक्ष्मण सरवदे रा. गौतम नगर गंगाखेड व आरोपी क्र. ३ हरीभाऊ ज्ञानोबा मुसळे रा. आनंद नगर गंगाखेड या दोघांना कलम ३०२, ३४ भा.द.वि. प्रमाणे जन्मठेप व प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या (Parbhani Woman Rape) प्रकरणात जिल्हा सरकारी अभियोक्ता डी.यु. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता सचिन बी. पौळ यांनी सक्षमपणे बाजु मांडली त्यांना सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.डी. वाकोडकर, गंगाखेड पोलीस ठाण्याचे कोर्ट पैरवीकार मपोशि स्नेहल एस. जिंकलवाड, सपोउपनि जे.एच. पठाण, कोर्ट पैरवीकार एम.डी. कुंडगीर, मपोह श्रीमती लिना व्ही. मुंढे आदींनी सहकार्य केले. गंगाखेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश २ व्ही.एम. सुंदाळे यांच्या न्यायालयात चालविण्यात आलेल्या खटल्यात न्यायालयाने आरोपीना जन्मठेपची शिक्षा ठोठावल्याने शांतता प्रेमी नागरिकांतून समाधान व्यक्त केल्या जात आहे तर अन्य गुन्ह्यांच्या खटल्यात सहभागी असलेल्या आरोपीमध्ये मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.