Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > क्राईम जगत

Family Death

पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; आर्थिक अडचणीतून टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय

पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू आर्थिक अडचणीतून टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय

मोरवाडीतील करिष्मा ग्लोरी सोसायटीतील घटना; सुसाईड नोट सापडली, संत तुकाराम नगर पोलिसांकडून तपास सुरू

पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरातील करिष्मा ग्लोरी सोसायटीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेत विनोद पिल्ले (वय ५०) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी सिरजा पिल्ले (वय ४५) आणि मुलगी पौर्णिमा पिल्ले (वय १९) या दोघींना गंभीर अवस्थेत वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच दोघींचाही मृत्यू झाला.

प्राथमिक तपासात पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट आणि रासायनिक द्रव्याचा डबा आढळून आला आहे. पत्रात आर्थिक अडचणींमुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद करण्यात आले असून, "या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये," असे विनोद पिल्ले यांनी लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विनोद पिल्ले यांनी आयआयएम अहमदाबाद येथून संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले होते. ते आपल्या कुटुंबासह मोरवाडीतील करिष्मा ग्लोरी सोसायटीत राहत होते. त्यांची पत्नी सिरजा पिल्ले या एका नामांकित शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. त्या कामावर न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, १ जून रोजी विनोद पिल्ले यांनी ऑनलाइन एक रासायनिक द्रव्य मागवले होते. त्यानंतर ते कोळशावर जाळून त्याचा धूर घरात पसरवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, या संदर्भातील सर्व बाबींची पडताळणी केली जात आहे.

तपासादरम्यान पिल्ले कुटुंबावर मोठे आर्थिक कर्ज असल्याची माहितीही समोर आली आहे. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी तीन वर्षांपूर्वी नेहरूनगर येथील स्वतःचे घर विकले होते. त्यानंतर हे कुटुंब मोरवाडी येथे भाड्याच्या घरात राहत होते.

या संपूर्ण प्रकरणाचा संत तुकाराम नगर पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मृत्यूमागील नेमके कारण आणि इतर कोणतीही शक्यता आहे का, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Related to this topic: