Kotwali Police Case: परभणीत डॉ. जगदीश शिंडे आणि बैरा पराग यांनी एका पिशवीच्या नकळती सोनेस दहा लाख रुपये घेऊन फसवणूक केली. त्यांवर दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दहा लाखाची फसवणूक; दोघांवर कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल
परभणी (Kotwali Police Case) : नकली सोने देवून डॉक्टरची दहा लाखाची फसवणूक करण्यात आली. ही घटना परभणी शहरात घडली. सदर प्रकरणी दोघांवर कोतवाली पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वस्त सोन्याचे अमिष डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे.
डॉ. जगदीश एकनाथराव शिंदे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीचे लोहगाव येथे रुग्णालय आहे. त्यांच्याकडे एक महिन्यापूर्वी बैरा पराग हा इसम उपचारासाठी आला होता. सदर इसमा सोबत डॉक्टरची चांगली ओळख झाली. आठ ते दहा दिवसापूर्वी बैरा पराग याने मला सोने सापडले आहे, ते मी तुम्हाला कमी किंमतीत देतो, असे डॉक्टरला सांगितले. १५ जुनला दुपारी सव्वा दोनच्या सुमारास फिर्यादी डॉक्टर आणि त्यांची पत्नी गंगाखेड रोडवर आले. या ठिकाणी बैरा पराग याचा चुलता भेटला.
संबंधित दोघांनी एका पिशवीमध्ये पंधरा तोळे सोने आहे, असे म्हणत सदर सोने देवून डॉक्टर जवळील दहा लाख रुपये घेतले. पिशवी उघडून पाहिल्यावर त्यामध्ये काळसर धातू दिसला. नकली सोने देत डॉक्टर जवळील दहा लाख रुपये घेऊन संबंधित पसार झाले. या (Kotwali Police Case) प्रकरणी बैरा पराग आणि त्याच्या चुलत्यावर कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.