Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > क्राईम जगत

Parbhan Jewelry Scam

परभणीत सोन्याच्या बिस्कीटाच्या मोहात मंगळसुत्रही गमावले..

Parbhan Jewelry Scam: परभणीतील पाथरी शहरात नकली सोन्याचे बिस्कीट देवून पाच ग्राम वजनाचे सोन्याचे असली मंगळसुत्र घेत एका महिलेची फसवणूक करण्यात आली.


परभणीत सोन्याच्या बिस्कीटाच्या मोहात मंगळसुत्रही गमावले

Parbhan Jewelry Scam |

 

पाथरी शहरातील घटना; दोन अनोळखीवर गुन्हा दाखल

परभणी/ पाथरी (Parbhan Jewelry Scam) : परभणीतील पाथरी शहरात नकली सोन्याचे बिस्कीट देवून पाच ग्राम वजनाचे सोन्याचे असली मंगळसुत्र घेत एका महिलेची फसवणूक करण्यात आली. ही घटना २४ जुलै रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास वाल्मीकी बँक जवळील टेंगसे रुग्णालयासमोरील रोडवर घडली. या प्रकरणी दोन अनोळखी इसमांवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुसया बन्सी धनले वय ६५ वर्ष, या माहिलेने तक्रार दिली आहे. २४ जुलैच्या दुपारच्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी संगणमत करत फिर्यादीला सोन्याचे बिस्कीट दिले. या बदल्यात ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणिमंगळसुत्र घेतले. महिलेने हे बिस्कीट तपासले असता सदर सोने नकली असल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने पाथरी पोलीस ठाणे गाठत दोन अनोळखी इसमांविरुध्द तक्रार दाखल केली आहे. प्रकरणाचा तपास पोह. रासवे करत आहेत. या अगोदर देखील फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. तरी देखील महिला, नागरीक भामट्यांच्या भुलथापांना बळी पडत आहेत. 

घरातून रोख रक्कम मोबाईल लंपास
परभणी : शेळ्या विक्री करुन आलेली तीस हजाराची रक्कम आणि पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल मिळून ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल अनोळखी चोरट्याने लंपास केला. ही घटना २१ जुलैच्या दुपारी बारा ते सायंकाळी पाच या दरम्यान सोनपेठ तालुक्यातील कारबेटवाडी येथे घडली. या प्रकरणी २४ जुलैला सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिमाबाई करण चौधरी यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीने आपल्या घरात तांदळाच्या डब्ब्यामध्ये सदर रक्कम आणि मोबाईल ठेवला होता. अनोळखी चोरट्याने सदर मुद्देमाल चोरुन नेला.

Related to this topic: