Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

अल्पवयीन मुली विनयभंग

घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी

Minor Girls Molestation: पोलीस स्थानकातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिली गेली. आरोपी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार अधिनियम


घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग जिवे मारण्याची धमकी

Minor Girls Molestation |

आखाडा बाळापूर (Minor Girls Molestation) : पोलीस स्थानकातंर्गत एका गावातील घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली याबाबत आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्थानक हद्दीतील एका गावात २५मे रोजी दुपारी एका घरात घुसून अल्पवयीन मुली सोबत गैरप्रकार करून विनयभंग करून कोणाला काही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली यामुळे आरोपी विरूद्ध भा.द.वि.विविध कलमानुसार व बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२नुसार गुन्हा दाखल करण्यात येउन पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, बिटप्रमुख राजेश घोंगडे पुढील तपास करत आहेत.

कपडे घेऊन गेलेली अल्पवयीन तरूणी बेपत्ता
आखाडा बाळापूर पोलीस स्थानक अंतर्गत (Minor Girls Molestation) एका गावातील अल्पवयीन तरूणी २४मे रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घरातील कपडे घेऊन गेली ती परतलीच नाही यामुळे तिचा शोध घेऊन मिळून आली नसल्याने २५मे रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लाउन पळवून नेले म्हणून आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात येउन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, बिटप्रमुख शेख अनसार करत आहेत.

Related to this topic: