Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > क्राईम जगत

धाड पोलिस कारवाई

धाड पोलिसांची तत्पर कारवाई; धामणगाव येथील मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघड

Dhad Police Raid: बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथे श्री गजानन महाराज साईबाबा संस्थानातील दानपेटीच्या चोरीतून एकूण ₹7,500 चोरी झाली. तापासावर पोलिसाने आरोपी निलेश गणेश माहाले अटक


धाड पोलिसांची तत्पर कारवाई धामणगाव येथील मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघड

Dhad Police Raid |

बुलढाणा (Dhad Police Raid) : तालुक्यातील धाड पोलीस ठाणे हद्दीतील धामणगाव येथील श्री गजानन महाराज साईबाबा संस्थान मंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणी धाड पोलिसांनी तात्काळ तपास करून अवघ्या दोन तासांत गुन्ह्याची उकल केली. या प्रकरणी फिर्यादी समाधान छगन पायधन (वय 59 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. धामणगाव, ता. जि. बुलढाणा) यांच्या फिर्यादीवरून कायमी अपराध क्र. 311/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान धाड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासांत गुन्ह्याची उकल करून निलेश गणेश माहाले (वय 33 वर्षे, रा. धामणगाव, ता. जि. बुलढाणा) यास ताब्यात घेतले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली.

चोरीस गेलेला मुद्देमाल :

* लोखंडी दानपेटी – अंदाजे किंमत ₹1,500/-
* दानपेटीतील रोख रक्कम – अंदाजे ₹6,000/-

एकूण चोरीस गेलेला मुद्देमाल : ₹7,500/-

हस्तगत मुद्देमाल :

* लोखंडी दानपेटी – अंदाजे किंमत ₹1,500/-
* रोख रक्कम – ₹6,000/-

एकूण हस्तगत मुद्देमाल : ₹7,500/- (चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 100% मुद्देमाल हस्तगत).

धाड पोलिसांच्या तत्पर तपासामुळे चोरीस गेलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, भा.पो.से., माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड तथा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अजिनाथ मोरे, प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन धाड, सहायक फौजदार प्रभाकर लोखंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज मुळे यांनी आरोपीस अटक केली.