Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > क्राईम जगत

भोंडे पेट्रोल पंप चोरी प्रकरण

भोंडे पेट्रोल पंप चोरीप्रकरणी आरोपी गजाआड; तब्बल 1 लाखांची रोकड जप्त

Bhonde Petrol Pump Theft Case: बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) तातडीने कारवाई


भोंडे पेट्रोल पंप चोरीप्रकरणी आरोपी गजाआड तब्बल 1 लाखांची रोकड जप्त

Bhonde Petrol Pump Theft Case |

बुलढाणा (Bhonde Petrol Pump Theft Case) : बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली १ लाख ५ हजार रुपयांची संपूर्ण रोकड (१०० टक्के) हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्याची यशस्वी उकल करण्यात आली आहे.

या (Bhonde Petrol Pump Theft Case) प्रकरणात फिर्यादी खंडू संतोषराव भोंडे (वय ३७, रा. म्हसला बु., ता. जि. बुलढाणा) यांनी १६ जुलै रोजी धाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, १५ ते १६ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंपातून १ लाख ५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी धाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २७३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशीष रोही यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास करत स्वप्नील नुदाराम वाघमारे (वय १९, रा. माँढाळा, ता. जि. बुलढाणा) याला अटक केली. तपासादरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेली १ लाख ५ हजार रुपयांची संपूर्ण रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास धाड पोलीस ठाणे करत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक (खामगाव) पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पीएसआय प्रताप बाजड तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.