Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > क्राईम जगत

बोरी पोलिस कारवाई

परभणीत टरमाईनच्या इंजेक्शनसह एक जण ताब्यात...?

Bori Police Action: बोरी येथे एकाच इंजेक्शनचा साठा ताब्यात घेतला. पोलिसांना वसूलीत झालेल्या जणांनी दावे केले की टरमाईनचे इंजेक्शन त्यांच्या सहकाऱ्यांच्या जवळून आणले गेले.


परभणीत टरमाईनच्या इंजेक्शनसह एक जण ताब्यात

Bori Police Action |

 

बोरी पोलिसांची कारवाई; दोन जणांवर गुन्हा दाखल

परभणी (Bori Police Action) :  बोरी येथे नशा करण्यासाठी टरमाईनचे इंजेक्शन विक्री करण्याकरीता स्वत: इंजेक्शनचा साठा बाळगलेल्या एकाला बोरी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. सोमवार २९ जून रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास बोरी येथील दिक्षा भूमी समोर ही कारवाई करण्यात आली. सदर प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरी पोलिसांचे (Bori Police Action) पथक गस्तीवर असताना या पथकाला एक इसम विना परवाना गुंगीकारक औषध विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी कारवाई करत एका दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. त्याच्या जवळ ५ हजार रुपये किंमतीच्या टरमाईन च्या इंजेक्शनचा साठा मिळून आला. संबंधिताची चौकशी केली असता त्याने आपले नाव मोहम्मद शोएब कुरेशी मोहम्मद अनवर असे सांगितले.

संबंधिताची विचारपूस केल्यावर त्याने सदरचे इंजेक्शन वसीम खान अक्तर खान याच्या जवळून आणले असल्याचे सांगितले. पोलिसांनी इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी मो. शोएब कुरेशी मो. अन्वर, वसीम खान अक्तर खान या दोघांवर बोरी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि. धोंडगे, पोउपनि. गायकवाड, पोलीस अंमलदार राजेश जटाळ, साळवणे, कांबळे, मोरे, फरीन रंगरेज यांच्या (Bori Police Action) पथकाने केली.