Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

बोदलकसा जलाशय अपघात

डोंगा उलटला, २ बुडाले-७ जण बचावले; पार्टी बेतली जीवावर

Bodalaksa Reservoir Accident:


डोंगा उलटला २ बुडाले-७ जण बचावले पार्टी बेतली जीवावर

Bodalaksa Reservoir Accident |

 

बोदलकसा येथील घटना : शोध व बचाव कार्य सुरू

तिरोडा/ गोंदिया (Bodalaksa Reservoir Accident) : तिरोडा/गोंदिया : तिरोडा तालुक्यातील बरबसपुरा/बेरडीपार येथील नऊ युवक नैसर्गिक आनंद घालविण्यासाठी बोदलकसा जलाशय परिसरात गेले होते. जलाशयाच्या ओव्हर रस्त्याजवळील वाघ मंदिर परिसरात युवकाची पार्टीही रंगली. त्यातच जलाशयात मासेमारीसाठी असलेला डोंगा पाहून नऊ तरूणांना नौकाविहाराचा मोह नडला. जलाशयाच्या मध्यभागी डोंगा उलटला. त्यातून सात जणांना बाहेर पडता आले तर दोघे जण खोल पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच तालुक्यातच एकच खळबळ उडाली. ही घटना आज (ता.१०) दुपारी ३ वाजता सुमारासची असून घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनाचे पथक शोध व बचाव कार्याला लागले आहेत. बातमी लिहेपर्यत बुडालेल्या युवकांचा पत्ता लागलेला नव्हता. कुणाल शालिक भोंडे (२०) व मोहित वसंत रहांगडाले (२१) दोन्ही राहणार बरबसपुरा/तिरोडा अशी त्या युवकांची नावे आहेत.

सविस्तर असे की, बरबसपुरा/तिरोडा येथील मोहित रहांगडाले, कुणाल शालिक भोेंडे, अक्षय नरेंद्र बिसेन,  राकेश राधेशाम लाडे,  निखिल इंदल पटले,  लक्की संजय रहांगडाले,   प्रलय राधेशाम पारधी, मनीष रमेश कोकूडे, अविनाश श्रावण टेकाम हे युवक पर्यटनाचा आनंदासाठी पार्टी करण्याकरीता बोदलकसा जलाशय परिसरात एकत्र आले होते. दरम्यान बोदलकसा जलाशय परिसरातील ओव्हर रस्त्याजवळील वाघ मंदिर परिसरात पार्टीचा आनंद घेत असताना नजिकच पडून असलेला डोंगा पाहून युवकांना नौकाविहाराचा छंद जडला.   त्यातच त्यांनी कसलीही  पर्वा न करता डोंगा घेवून जलाशयात उतरले. सर्वकाही व्यवस्थित असताना डोंगा असंतुलित होवून उलटला. या दुर्घटनेत गोंधळ उडालेल्या तरूणांमध्ये जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली. ज्या युवकांना पोहता आले ते सात युवक जलाशयाबाहेर पडले. तर मोहित रहांगडाले व कुणाल भोंडे या दोन्ही युवकांना जलाशयाबाहेर निघता आले नाही. दोन्ही मित्रांना पाण्यात बुडताना पाहत असतानाही त्या सातही तरूणांना काही करता आले नाही.

यामुळे पार्टीचा आनंदावर विरजन आले. या घटनेची माहिती मिळताच एकच धावपळ सुटली. तालुका प्रशासन, पोलिस प्रशासन व  आमदार विजय रहांगडाले यांच्यासह स्थानिक  पुढार्‍यांनी जलाशयाकडे धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन पथकाने पाण्यात बुडालेल्या दोन्ही युवकांचा शोधकार्य सुरू केले आहे. रात्री उशिरापर्यत दोन्ही युवकांचा पत्ता लागलेला नव्हता. परंतु, या दुर्दैवी घटनेला घेवून तिरोडा तालुकाच नव्हेतर जिल्ह्यात एकच शोककळा पसरली आहे.

कुणालला वाचविताना मोहितचा जीव गेला
आनंद साजरा करण्यासाठी युवकांसोबत गेलेले कुणाल भोंडे आणि मोहित रहांगडाले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोंगा उलटल्यानंतर कुणाल खोल पाण्यात जावू लागल्याने त्याला वाचविण्यासाठी मित्र मोहित रहांगडाले याने कसलीही पर्वा न करता कुणालला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्याचा जीवावर बेतला. परिणामी कुणाल व मोहित या दोघांचाही  बुडून मृत्यू झाला.

वादळाने केला घात
बोदलकसा जलाशय परिसरात नैसर्गिक वातावरणात  बसबसपुरा येथील नऊ युवक एकवटले. दरम्यान मासेमार्‍यांचा डोंगा घेवून जलाशयात नौकाविहार करण्यासाठी निघाले. दुपारी ३ वाजता सुमारास अचानक वादळी वारा सुटला. यामुळे नऊ जण सवार असलेल्या डोंग्याचा संतुलन बिघडला. अन् त्या वादळी वार्‍याने घात केला. डोंगा उलटल्याने कुणाल व मोहित पाण्यात बुडाले. तर अक्षय  बिसेन,  राकेश लाडे,  निखिल पटले,  लक्की  रहांगडाले,   प्रलय पारधी, मनीष कोकूडे व अविनाश टेकाम हे सातही युवकांना जीव वाचविता आले.