Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > क्राईम जगत

पिकअप दुचाकी अपघात

भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; खुडज येथील इसम जागीच ठार

Pickup bike accident: सेनगाव–हिंगोली मुख्य रस्त्यावर पिकअपने दुचाकीला धडक देऊन खुडज येथील महादेव डोंगर यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक फरार झाला असून पोलिस शोध मोहीम सुरू आहे.


भरधाव पिकअपची दुचाकीला धडक खुडज येथील इसम जागीच ठार

Pickup bike accident |

अपघातानंतर चालक फरार

सेनगाव (Pickup bike accident) : सेनगाव–हिंगोली मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने खुडज येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची भीषण घटना बुधवारी ता. ६ मे रोजी सायंकाळी घडली. अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खुडज येथील महादेव मारोती डोंगर, वय ५१ हे रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर ते सेनगाव येथील आठवडी बाजारासाठी दुचाकीवरून निघाले होते. सेनगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या ‘हॉटेल १९ फेब्रुवारी’ जवळ त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिली.

या (Pickup bike accident) भीषण अपघातात महादेव डोंगर यांच्या पायांना गंभीर फ्रॅक्चर झाले असून छाती, गळा व गुप्तांगांना जबर दुखापत झाली. अपघाताची तीव्रता एवढी होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अपघात घडताच पिकअप चालकाने वाहन सोडून घटनास्थळा वरून पलायन केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बिट जमादार सुभाष चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचारी गजानन कुंडकर, गजानन मुटकुळे, संतोष जाधव यांनी पंचनामा करून मृतदेह सेनगाव ग्रामीण रुग्णालयात हलविला. मृत महादेव डोंगर हे हमालीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष अचानक गेल्याने खुडज गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, फरार पिकअप चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: