Eco Bank ATM Theft: परभणीत इको बँक एटिम चोराचा १८ जुलै रोजीचा आरोपी पुनमसिंग टाक (३९ वर्ष) जप्त करण्यात आला. त्या आरोपीने ₹57,500चे मुद्देमाल आणि दोन दुचाकी
५७ हजारांची रोकड, दोन दुचाकी जप्त चौकशीत इतर पाच गुन्ह्यांची उकल
परभणी (Eco Bank ATM Theft) : शहरातील इको बँकेच्या एटीएम फोडून चोरी केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक आरोपीस ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील इको बँकेचे एटीएम फोडून चोरी केल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १८ जुलै रोजी सोनपेठ, परळी व आंबाजोगाई परिसरात तपास करीत असताना परळी वैजनाथ येथे गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने आंबाजोगाई येथे छापा टाकून पुनमसिंग टाक वय ३९ वर्ष आंबाजोगाई याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक विचारपुस केली असता जगजितसिंग आचोलसिंग दुधानी रा.परळी , लक्ष्मणसिंग ठाकुरसिंग बावरी रा.नांदेड तसेच जगजितसिंग दुधानी याच्या मावस भावासह परभणीतील एटीएम फोडून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी पुनमसिंग टाक याच्याकडून ५७ हजार ५०० रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन दुचाकी व गॅस सिलेंडर, गॅस कटर आदि साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान, आरोपी जगजितसिंग आचोलसिंग दुधानी, लक्ष्मणसिंग ठाकुरसिंग बावरी व अन्य एक आरोपी यांचा शोध सुरु आहे.
पुढील चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारां सह कोतवाली (परभणी), दैठणा, नानलपेठ, मुरुड आणि उदगीर या ठिकाणी मिळून एकूण पाच एटीएम चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोतवाली पोलीस ठाणे, येथे हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत. हि कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या सुचनेनुसार स्थागुशाचे पोनि.गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि.अशोक जायभाय, पोउपनि.चंदनसिंह परिहार, पोउपनि. गणेश सवंडकर, पोह. विलास सातपुते, सूर्यकांत फड, महेश कवठाळे, सचिन भदरगे, राहुल परसोडे, माणिक वाघ, रंगनाथ दुधाटे, नेताजी गित्ते, केशव लटपटे, महारुद्र सपकाळ, रंजित आगळे, सिद्धेश्वर चाटे, नामदेव डबे, लक्ष्मण कांगणे, महेश पांगरकर, उत्तम हानवमे, विष्णु चव्हाण, मधुकर ढवळे, शरद सावंत, दिलीप निलपत्रेवार, हनुमान ढगे, राम पौळ, निलेश परसोडे आणि प्रमोद पुरी यांच्या पथकाने केली.