Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

अल्पवयीन मुलगी अत्याचार

परभणीत लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन अत्याचार...!

Minor Girl Sexual Assault: अल्पवयीन मुलाला लग्नामिष दाखवून आणि विनयभंग करण्यात आले. परभणी व झिंतूर येथील घटनेत पोलिसात गुन्हा दाखल करून तपास सुरू.


परभणीत लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन अत्याचार

Minor Girl Sexual Assault |

परभणीत पालम तालुक्यातील घटना आरोपीवर गुन्हा दाखल

परभणी (Minor Girl Sexual Assault) : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना पालम तालुक्यातील सादलापूर येथे घडली. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपीने १३ मार्च २०२६ रोजी पिडिता ही अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्या सोबत संबंध ठेवले. या (Minor Girl Sexual Assault) प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन राम दत्ता वल्लपवाड याच्यावर पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

लग्न कर म्हणत मुलीचा विनयभंग

परभणी : माझ्या सोबत लग्न कर असे म्हणत अल्पवयीन मुलीला त्रास (Minor Girl Sexual Assault) देण्यात आला. तिचा हात पकडत विनयभंग करण्यात आला. या बाबत विचारणा केल्यावर मुलीची आई व इतरांना धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना २ जुलै रोजी दुपारी साडे चारच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील वझर आठवडी बाजार परिसरात घडली. पिडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन नारायण समाधान मते याच्यावर बामणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related to this topic: