Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > क्राईम जगत

सेवानिवृत्त शिक्षक मारहाण प्रकरण

सेवानिवृत्त शिक्षक व त्यांच्या मुलास जिवानिशी मारण्याचा प्रयत्न

Retired teacher assault case: कंधा प्रभागात सेवानिवृत्त शिक्षक रामु गि.हे व त्याचा मुलगा गंभीर जखमी झाले. भांडणातील आरोपी निलेश कुंभलकर व मागील दुधारकांनी शिक्षक आणि मुलाला लोखंडी पाईपाने मारून


सेवानिवृत्त शिक्षक व त्यांच्या मुलास जिवानिशी मारण्याचा प्रयत्न 

Retired teacher assault case |

आरोपीने मारल्याची तक्रार देण्यास दुचाकीने जाताना कारने धडक मारून केले गंभीर जखमी

कन्हान (Retired teacher assault case) : कांद्री प्रभाग क्रं.१३ येथे घराच्या बांधका मावरून झालेल्या भांडणात सेवानिवृत्त शिक्षक रामु गि-हे व त्यांचा मुलगा मधस्थी करायला गेल्याने दोन्ही वडिल व मुलाला लोखंडी पाईपाने निलेश कुंभलकर याने मारहाण केल्याने रामुजी गि-हे व मुलगा ऋषीकेश दुचाकीने कन्हान पोस्टे ला तक्रार करण्यास जात अस ताना कारने नागपुर जबलपुर महामार्गावर नाका नं. ७ मरघडे दुकाना सामोर दुचाकी ला उमेश कुंभलकर या ने मागुन येऊन कारने जोरदार धडक मारल्याने वडील व मुलगा खाली पडुन दुचाकी आंबेडकर चौक पर्यंत घिसाटत नेली. या अपघातात जख्मी वडिल व मुलगा याचा नागपुर येथे उपचार सुरू असुन कन्हान पोलीसा नी तीन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे. 

श्री रामु महादेव गि-हे वय ६४ वर्ष रा. प्रभाग क्र. १३ कांद्री- कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपुर हे सेवा निवृत्त शिक्षक असुन त्यांचे घरा शेजारी निलेश केशव कुंभलकर वय अंदाजे ४५ वर्ष, उमेश केशव कुंभलकर वयु ४० वर्ष व त्यांचे जावई किशोर सदाशिव पोटभरे वय अंदाजे ५५ वर्ष हे राहत असुन मागिल दिड वर्षा पुर्वी रामुजी गि-हे घराचे बांधकाम करित असतांना किशोर पोटभरे यांच्या पत्नीने आमच्याकडे येवुन बांध काम करायचे नाही असे म्हटले होते. सोमवार (दि.२५) मे २०२६ ला किशोर पेटभरे यांना त्यांचे घराचे बांधका म करायचे असल्याने रामुजी गि-हे यांचे कडे सकाळी ९ वाजता आले आणि आम्ही तुमच्या घराकडे येवुन काम करू शकतो का ? त्यावर रामुजी गि-हे म्हणाले की, तुम्ही आम्हाला बांधकाम करू दिले नाही व त्रास दिला. आता आम्ही आमच्या घराकडे येवुन काम करू देणार नाही. तेव्हा किशोर पोटभरे यांची सासु बेबीबाई कुंभलकर हिने शिवीगाळ करून भांडणाला सुरुवात केली.

तेव्हा निलेश केशव कुंभलकर याने हातात लोखं डी पायपाचा तुकडा आणुन भांडण केले व रामुजी च्या उजच्या हाताच्या दंडावर मारले, त्यांचा मुलगा ऋषीकेश (Retired teacher assault case) हा झगडा सोडवण्यास मध्यस्थी करिता आला अस ता मुलाच्या डाव्या हाताच्या बोटांवर मारले. त्यामुळे रामुजी मुलगा ऋषीकेस याचे सोबत हिरो पल्सर दुचा की क्र.एमएच ४० व्ही - ४०८८ ने पोलीस स्टेशन कन्हान येथे तक्रार देण्यास जात असता उमेश केशव कुंभलकर कार क्र.एमएच ४ बीजे ७३२२ ने हे सुध्दा पोलीस स्टेशन ला पाठीमागुन जात असतांना ९.३० वा.च्या दरम्यान उमेश ने हिरो पॅल्सर दुचाकी ला पाठी मागुन नाका नं. ७ मरघडे यांचे दुकाना समोर जबलपुर नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वर जोरदार धडक मार ल्याने वडिल, मुलगा दोघेही खाली पडुन गंभीर जख्मी झाले. तर कारने दुचाकी ला नाका नं. ७ ते आंबेडकर चौक कन्हान पर्यंत म्हणजे ५०० मीटर लांब घिसाटत नेली. यात रामुजीच्या डोक्याला, पाठीला, दोन्ही हाता ला, पायाला मार लागला तसेच मुलगा ऋषीकेस याचे दोन्ही हाताला व पाठीला, डाव्या पायाला मार लागल्या ने वडिल व मुलाचा प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे प्राथमिक उपचार करून डॉक्टरने पुढील उपचारार्थ  नागपुर ला पाठवुन तेथे दोन्ही जख्मीवर उपचार सुरू करण्यात आला आहे. 

फिर्यादी सेवानिवृत्त शिक्षक रामुजी गि-हे यांच्या तोंडी बयाणावरून कन्हान पोलीसानी पोलीस निरिक्ष क वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात आरोपी १) बेबीबाई केशव कुंभलकर, २) निलेश केशव कुंभलकर वय ४५ वर्ष, ३) उमेश केशव कुंभलकर वय ४० वर्ष, तिघेही राह. प्रभाग क्र.१३ कांद्री- कन्हान यांचे विरूध्द कलम ११८(१), २८१, ३(५), ३५२ बी.एन.एस २०२३ अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.

Related to this topic: