Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आरोग्य

आमदार श्वेता महाले पाटील

चिखली उपजिल्हा रुग्णालयाच्या दुप्पट श्रेणीवर्धनाला मंजुरी...

MLA Shweta Mahale Patil: चिखलीच्या आरोग्यक्षेत्रासाठी ऐतिहासिक निदान झाले असून शासनाने रुग्णालयाचे दुप्पटकरण मंजूर केले आहे. यामुळे हजारो रुग्नांना सुसज्ज आरोग्यसेवा उपलब्ध होईल.


चिखली उपजिल्हा रुग्णालयाच्या दुप्पट श्रेणीवर्धनाला मंजुरी

MLA Shweta Mahale Patil |

 

चिखलीच्या आरोग्य क्षेत्रासाठी ऐतिहासिक निर्णय; ५० खाटांचे रुग्णालय आता १०० खाटांचे...

चिखली (MLA Shweta Mahale Patil) : चिखली येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याच्या बहुप्रतिक्षित मागणीला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून, चिखली विधानसभा मतदारसंघासाठी ही मोठी आरोग्यविषयक उपलब्धी मानली जात आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामागे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी केलेला सातत्यपूर्ण आणि बहुआयामी पाठपुरावा निर्णायक ठरला आहे. विधानसभेच्या अधिवेशनात त्यांनी वारंवार हा विषय उपस्थित केला होता. तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय स्तरावरील बैठका आणि प्रत्यक्ष मंत्रीस्तरीय चर्चांमधून त्यांनी या मागणीचा सातत्याने आग्रह धरला होता.

चिखली आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, अपघातांचे वाढते प्रमाण, ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या आणि बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य सुविधांवरील ताण लक्षात घेता, चिखली येथे १०० खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय होणे ही काळाची गरज असल्याचे आमदार श्वेता महाले पाटील यांनी वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

या मागणीची दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयात विशेष लक्ष घालून प्रशासकीय स्तरावर आवश्यक समन्वय साधत या प्रस्तावाला गती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष हस्तक्षेपामुळे हा महत्त्वाचा निर्णय मार्गी लागल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.

शासन निर्णयानुसार आता श्रेणीवर्धित रुग्णालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे, इमारत बांधकाम, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीची प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येणार आहे. यामुळे चिखलीसह परिसरातील हजारो रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे.

या निर्णयामुळे माता-बाल आरोग्य, आपत्कालीन सेवा, शस्त्रक्रिया, अतिदक्षता उपचार आणि विविध तज्ज्ञ वैद्यकीय सेवा चिखलीतच उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे आभार मानले असून, चिखली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपला प्रयत्न यापुढेही सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे...