कोरची आई-बाळ मृत्यू

अंधश्रद्धेमुळे कोरची तालुक्यात आई-बाळाचा मृत्यू

Korachi Mother-Child Deaths: कोरची तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या विस्कळीत कारभारामुळे गर्भवती रमुला महेश काटेन्गे आणि तिच्या नवजात बालिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाला.

अंधश्रद्धेमुळे कोरची तालुक्यात आई-बाळाचा मृत्यू

Korachi Mother-Child Deaths

मांत्रिकाकडे गेल्याने उपचारासाठी झाला विलंब
आरोग्य यंत्रणेने रुग्णालयात दाखल होण्यास केला होता आग्रह

कोरची (Korachi Mother-Child Deaths) : कोरची तालुक्यातील अंधश्रद्धा बुवाबाजी आदी बाबींमुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला असून, रुग्णालयात दाखल न होता मांत्रिकाकडे गेल्यामुळे आणखी एका मातेचा नवजात बाळासह मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोग्य यंत्रणेने रुग्णालयात दाखल होण्यासाठी प्रयत्न करूनही वेळेवर गर्भवती माता रुग्णालयात दाखल झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

त्यामुळे हुडूकदुमा येथील 24 वर्षीय गर्भवती रमुला महेश काटेन्गे हिचा नवजात बालिकेसह मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरचीपासून सुमारे 17 किमी अंतरावरील हुडूकदुमा गावातील रमुला काटेन्गे हिला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिच्या पतीने आशा वर्करला संपर्क साधला. रुग्णाची परिस्थिती गंभीर झाल्यानंतर सकाळी 102 क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून तिला कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टर उके व डॉक्टर ईटणकर यांनी प्रसूती केली. सुरुवातीला रमूला यांना मांत्रिकाकडे नेल्यामुळे वैद्यकीय उपचारास विलंब झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

विलंबाने रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर रमुलाने एका मुलीला जन्म दिला. मात्र ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आई आणि बाळ दोघांनाही वाचवता आले नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, कोरची तालुक्यातील अंधश्रद्धाबाबत कायमच प्रश्नचिन्ह राहिले असून, यापूर्वीही अशा प्रकारच्या माता-बाल मृत्यूच्या (Korachi Mother-Child Deaths) घटना घडल्या आहेत.

तसेच 102 रुग्णवाहिकेत ऑक्सिजन व डॉक्टरांची सुविधा नसल्याने गंभीर रुग्णांना उपचारासाठी नेताना मोठा धोका निर्माण होत असल्याचेही समोर आले आहे. या (Korachi Mother-Child Deaths) सर्व प्रकारामुळे कोरची तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.

 

संबंधित सामग्री

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

कोरचीतील धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली.

Sep 26, 2026
नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

कोरचीच्या वार्ड क्रमांक १६ मध्ये नगरपंचायतीच्या नळातून मीटरभराचा नाळू निघाल्याचा प्रकार समोर आला असून, पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Sep 24, 2026
शेकडो मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; नगरपंचायतीने पाठवली केवळ १० जनावरे!

शेकडो मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; नगरपंचायतीने पाठवली केवळ १० जनावरे!

कोरची शहरात शेकडो मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर झाला असून, चार-पाच वर्षांपासून निवेदने देऊनही समस्या कायम आहे. नगरपंचायतीने केवळ १० जनावरे गोशाळेत पाठवल्याने नागरिक संतप्त आहेत.

Sep 10, 2026
मोकाट जनावरांना गोशाळेचा आसरा, नगरपंचायतीची कारवाई

मोकाट जनावरांना गोशाळेचा आसरा, नगरपंचायतीची कारवाई

Korchi Nagar Panchayat: कोरची शहरातील रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या संचाराला आळा घालण्यासाठी नगरपंचायतीने कारवाईचा बडगा उगारला आहे. रहदारीच्या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावर

Sep 09, 2026
गडचिरोलीत १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू; आरोग्य यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

गडचिरोलीत १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू; आरोग्य यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

गडचिरोलीत अवघ्या १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू झाला आहे. धानोरा तालुक्यातील दिव्या रामसिंग उईके यांचा प्रसूतीदरम्यान बाळासह मृत्यू झाला.

Sep 09, 2026