Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आरोग्य

हिंगोली जिल्हा रुग्णालय

हिंगोली जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेस शिवीगाळ व मारहाण

Hingoli District Hospital: हिंगोलील एका कंट्रॅक्टच्या नर्सने कर्तव्यावर असलेल्या अडथळ्यापर्यंत दोन महिलांनी शिवीगाळ आणि मारहाण करण्यासह मोबाईल फोन नुकसान दाखवून धमकी दिल्या.


हिंगोली जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेस शिवीगाळ व मारहाण

Hingoli District Hospital |


दोघींविरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली (Hingoli District Hospital) : कर्तव्यावर असताना अडथळा आणून शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका कंत्राटी परिचारिकेच्या तक्रारीवरून दोन महिलांविरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाग्यश्री मारोती राऊत, या हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कंत्राटी स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहेत. दि. 13 जुलै रोजी दुपारी 3.30 ते 4.00 च्या सुमारास त्या रुग्णालयातील सोनोग्राफी वॉर्डमध्ये शासकीय कर्तव्यावर असताना आरोपी संगिता तुरुकमाने आणि तिची आई, रा. राहोळी, ता. जि. हिंगोली या दोघींनी तेथे येऊन गोंधळ घातला.  

"माझा नंबर उशिरा का लावला" असे म्हणत दोघींनी फिर्यादीला शासकीय कामात अडथळा आणला. यानंतर त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली, थापडाबुक्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या हाणामारीत फिर्यादीचा अंदाजे 5000 रुपये किमतीचा मोबाईल फोन देखील फोडून नुकसान करण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.  

या प्रकरणी भाग्यश्री राऊत यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दि. 13 जुलै रोजी रात्री 8.56 वाजता नोंदवण्यात आला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास ग्रे. पोउपनि काळे हे करत आहेत.

Related to this topic: