ज्वारी शेत आग

शेतातील ज्वारीचा कडबा आगने भस्मसात; दहा लाखांचे नुकसान

Sorghum field fire: भूम तालुक्यातील शेतकरी महादेव मंगिरे यांच्या शेतात विद्युत तारेच्या स्पार्कमुळे ज्वारीच्या कडब्याच्या गंजीजवळ आग लागली.

शेतातील ज्वारीचा कडबा आगने भस्मसात; दहा लाखांचे नुकसान

Sorghum field fire

नुकसानभरपाईची मागणी

भूम (Sorghum field fire) : भूम तालुक्यातील वांगी खुर्द येथील शेतकरी महादेव (दादा) मंगिरे यांच्या शेतातील ज्वारीचा कडबा ता १२ रोजी दुपारच्या वेळेस विद्युत तारेतून निघालेल्या स्पार्कमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. या आगीत सुमारे २६ हजार कडब्याच्या पेंड्या भस्मसात (Sorghum field fire) झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. महादेव मंगिरे यांनी जनावरांच्या वर्षभराच्या वैरणीसाठी मोठ्या प्रमाणात ज्वारीचा कडबा विकत घेऊन शेतात तीन ठिकाणी गंजी करून साठवून ठेवला होता. या गंजीजवळून गेलेल्या विद्युत तारेच्या घर्षणामुळे अचानक स्पार्क झाला आणि त्यातून ठिणग्या पडून आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत कडब्याच्या गंजींना वेढा घातला.

आग लागल्याचे (Sorghum field fire) लक्षात येताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडबा कोरडा असल्याने आग वेगाने पसरली. घटनेची माहिती मिळताच बार्शी अग्निशमन दल यांची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून एका गंजीतील आग नियंत्रणात आणली. परंतु तोपर्यंत जवळील दोन गंजी पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या.

या (Sorghum field fire) आगीत सुमारे २६ हजार कडब्याच्या पेंड्या जळाल्याने मंगिरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचा मोठा साठा नष्ट झाल्याने त्यांच्यासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. घटनेनंतर पंचनामा करून शासनाने तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसांत विद्युत तारा सैल होणे, घर्षण होणे आणि त्यातून ठिणग्या पडण्याच्या घटना वाढत असल्याने महावितरणने ग्रामीण भागातील विद्युत वाहिन्यांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
रोहीच्या कळपांचा शेतात धुमाकूळ; सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान

रोहीच्या कळपांचा शेतात धुमाकूळ; सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान

Nilgai Crop Damage: 'रोही' या वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून या प्राण्यांमुळे सोयाबीन, तूर, उडीद, मूग तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Aug 02, 2026
पेरणीविना येरोळ परिसर काळाभोर; पावसाअभावी 15 गावांवर दुष्काळाची गडद छाया! 

पेरणीविना येरोळ परिसर काळाभोर; पावसाअभावी 15 गावांवर दुष्काळाची गडद छाया! 

Unsown Farmland: शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरातील पंधरा गावातील शेतशिवार खरीप पेरणीविना रिकामा काळाभोर दिसत असून उजाड शिवारामुळे शेतकरी धास्तावला आहे.

Jul 27, 2026
सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान

सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान

तालुक्यात गुरुवारी (५ जून) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे.

Jun 06, 2026
परभणीच्या वांगी येथे शॉर्टसर्किट होऊन आखाड्यास लागली आग

परभणीच्या वांगी येथे शॉर्टसर्किट होऊन आखाड्यास लागली आग

Parbhani short circuit fire: परभणी तालुक्यातील वांगी येथील एका शिवारातील आखाड्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. विद्युत तारांमुळे जळलेल्या ठिंगांमुळे आखाड्याला आग लागली.

May 31, 2026